Goa Government: शिवोली-सडये पंचायत बसविणार 13 ब्लॅक स्पॉटवर सीसीटीव्ही कॅमेरे

Goa Government: उघड्यावर कचरा फेकणाऱ्या उल्लंघनकर्त्यांवर आळा घालण्यासाठी शिवोली-सडये पंचयातीने 35 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: उघड्यावर कचरा फेकणाऱ्या उल्लंघनकर्त्यांवर आळा घालण्यासाठी शिवोली-सडये पंचयातीने 35 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश चतुर्थी उत्सवानंतर हे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Goa Government
Goa Home science College: ‘अन्नाचा अपव्यय थांबवा’ राज्य सरकारचे आवाहन

सरपंच दीपा पेडणेकर व उपसरपंच नीलेश वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत मंडळाने उघड्यावर कचरा टाकणे व इतर बेकायदा कामांवर आळा घालण्यासाठी सातही प्रभागांत सुवर्णमहोत्सव निधीअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव मांडला होता. या सीसीटीव्हींचा वापर प्रामुख्याने विविध ब्लॅक स्पॉट्सवर म्हणजेच रस्त्याच्या कडेला कचरा फेकणाऱ्यांना रोखण्यासाठी केला जाईल.

सरपंच दीपा पेडणेकर यांनी सांगितले की, राज्य सरकारने दिलेल्या सुवर्णमहोत्सवी निधीचा वापर आम्ही सात प्रभागांत १३ वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी करणार आहोत. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निविदा काढली आहे.

कंत्राटदाराने कॅमेरे व खांब आणले असून चतुर्थीनंतर हे काम सुरू होईल. या सीसीटीव्हीसाठी सुमारे २६.८९ लाख रुपये खर्च असून १३ ठिकाणी हे ३५ कॅमेरे बसवण्यात येतील, असे सरपंच पेडणेकर यांनी सांगितले.

उपसरपंच नीलेश वायंगणकर म्हणाले, गावाबाहेरील लोकांकडून कचरा टाकण्याचा मुद्दा ग्रामस्थांनी अनेकदा उपस्थित केला. त्यानुसार आम्ही तीन माड जिथे एमआरएफ शेड तसेच दोन कॅमेरे शिवोली-मार्ना तसेच सडये न्यू लिंक रोड, आणि इतर ठिकाणी कॅमेरे बसविणार आहोत. ब्लॅक स्पॉटवर कचरा टाकताना आढळलेल्यांवर कारवाईसाठी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांशी शेअर केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com