Shigmotsav Goa: साखळी 'टेम्पल टाऊन' म्हणून प्रचलित होईल; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत शिगमोत्सव उत्साहात, Photo Video पाहा

Goa Shigmotsav Photo Video: साखळीतील रस्त्यांवर पारंपरिक नृत्य, पारंपरिक वाद्यांचा तालबद्ध आवाज आणि सांस्कृतिक ठेवा यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला.
Goa CM Pramod Sawant in Shigmotsav
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: गोव्याच्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक उत्सवाची शनिवारी (२९ मार्च) सांगता होत आहे. साखळीत शुक्रवारी मोठ्या उत्साहात शिगमोत्सव साजरा झाला. या उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही सहभागी झाले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी साखळी शिगमोत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

मुख्यमंत्री सावंत यांनी साखळीत शिगमोत्सवात सहभाग नोंदवला. साखळीतील रस्त्यांवर पारंपरिक नृत्य, पारंपरिक वाद्यांचा तालबद्ध आवाज आणि सांस्कृतिक ठेवा यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला, असे सावंत यांनी शिगमोत्सवाचे फोटो शेअर करताना म्हटले आहे.

Goa CM Pramod Sawant in Shigmotsav
Goa University: पेपरचोरी प्रकरणातील प्राध्यापकावर कारवाई होणार! कार्यकारी परिषदेकडून शिक्कामोर्तब; पोलिसांकडूनही चौकशी सुरू

मुख्यमंत्री सावंत यांनी साखळीतील शिगमोत्सवाच्या परेडाचा व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत शिगमोत्सव परेड, ढोल- ताशांचा आवाज आणि रोषणाईचे सुंदर दर्शन घडत आहे.

'साखळी शहराचा होत असलेला विकास हे सर्वांच्या योगदानाचे फलित असून भविष्यात लोकांनी जर सहकार्य केले तर देशातील अव्वल शहर म्हणून साखळी शहराची गणना निश्चितच होईल. या शहरात केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध असून तीन उच्च पदवीची महाविद्यालये साखळीत आहेत. त्याचप्रमाणे येथील मंदिरांचे सौंदर्यीकरण व पर्यटनदृष्ट्या झालेला विकास पाहता या शहराला ‘टेम्पल टाऊन’ असेही नाव पुढे प्रचलित होईल', असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. साखळी येथे शिमगोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सावंत बोलत होते.

Goa CM Pramod Sawant in Shigmotsav
Goa Education: अखेर आदेश जारी! शैक्षणिक वर्ष 7 एप्रिलपासूनच; शाळांचे वेळापत्रक, सुट्ट्या याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

साखळी शिमगोत्सव समिती व गोवा राज्य पर्यटन खात्यातर्फे आयोजित शिमगोत्सव मिरवणुकीची सुरुवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ढोलावर काठी हाणून केली. यावेळी साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक तथा शिमगोत्सव समितीचे कार्याध्यक्ष दयानंद बोर्येकर, पद्मिनी फाऊंडेशनच्य अध्यक्षा सुलक्षणा सावंत, इन्स्टाग्राम फेम रूद्र घोडगे इतर नगरसेवक, विविध पंचायतींचे सरपंच उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुलक्षणा सावंत यांनी, शिमगोत्सवात गोव्यात विविध रूपे पहायला मिळतात व त्यास गोवा सरकार बरेच सहकार्य करते. त्यामुळेच गोव्याची कला व संस्कृती जगासमोर येण्यास मदत होते, असे म्हटले. नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अनिल वेर्णेकर यांनी केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com