Sand Mining: शापोरा नदीतून पारंपरिक पद्धतीने रेतीउपसा करण्यासाठी पर्यावरणीय परवाने मिळालेले आहेत. त्यामुळे या आठवड्यात रेतीउपशासाठी अर्ज मागविण्यात येतील, अशी माहिती माहिती खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानबाग यांनी दिली.
दरम्यान, जैवविविधता मंडळाकडून शापोरा नदीतून रेती काढण्यासाठी पर्यावरणीय परवाने प्राप्त झाले असून याबाबतची अंतिम अधिसूचना 2 डिसेंबर रोजी काढण्यात आली आहे. रेतीउपसाधारकांकडून परवान्यासाठी अर्ज या आठवड्यात मागविण्यात येतील. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेला रेतीउपसा व्यवसाय सुरू होईल, असे शानबाग म्हणाले.
दुसरीकडे झुवारी आणि मांडवी नदीसाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या वतीने केलेल्या विविध सर्व्हेक्षणांचे अहवाल खात्याला प्राप्त झाले आहेत. हे दोन्ही अहवाल खात्याच्या वेबसाईटवर लोड करण्यात आलेले आहेत.
झुवारी आणि मांडवी नदीचे सर्व्हेक्षण
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने झुवारी नदीचे दोन प्रकारे सर्व्हेक्षण केलेले आहे. बोरी पूल, राशोल, शिरोडा, चांदर, पंचवाडी, कुडचडे येथे 84 लाख 91 हजार 90 क्युबिक मीटर आणि 13 लाख 25 हजार 744 टन वाळू उपलब्ध आहे असे अहवालात म्हटले आहे. तर, मांडवी नदीत खांडेपार, कोठंबी, वळवई, नार्वे, पिळगाव, बेतकी, आमोणा येथे 5 लाख 89 हजार 838 क्युबिक मीटर वाळू आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.