Goa Scandal: कथित सेक्स स्कँडल प्रकरणी कुणाचीही नाहक बदनामी नको!- मुख्यमंत्री

कोणीही सोशल मीडियाचा वापर करून वैयक्तिक जीवनामध्ये दखलअंदाज करू नये
Goa Scandal
Goa ScandalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Scandal कथित सेक्स स्कँडलप्रकरणी कोणतीही तक्रार नसताना उगीच कोणाची नावे घेऊन बदनामी लोकांनी करू नये. कुणाच्‍या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करणे योग्य नाही. सोशल मीडियाचा गैरवापर केला जाऊ नये.

अशा प्रकारची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. ज्यांच्याविरुद्ध पोलिस स्थानकात तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

Goa Scandal
Tapobhumi Goa: गोव्यातील विक्रमाची 'एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद; यज्ञोपवीत धारण सोहळा ठरला लक्षवेधी

कोणीही सोशल मीडियाचा वापर करून वैयक्तिक जीवनामध्ये दखलअंदाज करू नये, असा सोशल मीडियावरील सगळ्यांना माझा सल्ला आहे. जर एखाद्याविरुद्ध तक्रार देण्यात आली असल्यास त्याची चौकशी व्हायला पाहिजे;

मात्र उगाचच एखाद्याला बदनाम करणे योग्य नाही. तसेच नको त्या प्रकरणात नाक खुपसण्याची गरज नाही. महिलांची अशा पद्धतीने केलेली बदनामी सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com