Goa Sesa Workers : सेझा’ कामगारांचे प्रश्‍‍न सुटेपर्यंत कंपनीला सहकार्य नाही ; मुळगाव पंचायतीचा निर्णय

ग्रामस्‍थांनीही जाहीर केला पाठिंबा; संयुक्त बैठकीत एकजुटीचे दर्शन
Goa Sesa Workers
Goa Sesa WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sesa Workers : वेदान्‍ता कंपनीने कपात केल्याने संकटात सापडलेल्‍या ‘सेझा’‍ कामगारांना पंचायतीसह आता मुळगाव ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला आहे. बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या या कामगारांना सेवेत सामावून घ्या, तसेच खाणव्यवसायामुळे उद्‌भवलेले गावावरील संकटही दूर करा, अशी मागणी मुळगाववासीयांनी केली आहे. कामगारांचा प्रश्‍‍न सुटेपर्यंत वेदान्‍ता कंपनीला स्थानिक पंचायतीने कोणतेही सहकार्य करू नये, असा निर्णयही मुळगाव येथे झालेल्या कामगार आणि ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

मुळगाव येथील श्री केळबाई मंदिरात आज रविवारी झालेल्या या बैठकीला सेझाच्या स्थानिक कामगारांसह मुळगाव पंचायत मंडळ, देवस्थान समिती, कोमुनिदाद मंडळ, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. कामगारांच्या प्रश्नांसह गावातील समस्यांबाबत सरकारला निवेदन देण्याबाबतही चर्चा झाली. पुढील रविवार दि. १६ जुलैला पुन्हा एक संयुक्त बैठक घेऊन पुढील कृती निश्चित करण्याचेही ठरविण्यात आले.

Goa Sesa Workers
France Gas Explosion Video: पॅरिसमध्ये गॅसचा भीषण स्फोट; इमारती उद्धवस्त, अनेकजण जखमी

मुळगाव ग्रामपंचायत ‘सेझा’ कामगारांच्या पाठीशी आहे. या कामगारांचा प्रश्न सुटेपर्यंत पंचायत खाण कंपनीला सहकार्य करणार नाही. पुढील बैठकीत कृती निश्चित करण्यात येईल.

तृप्ती गाड, मुळगाव सरपंच

अमर्याद खाण व्यवसायामुळे मुळगाव गावावर भविष्‍यात मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता आहे. याचा गांभीर्याने आणि सखोल विचार करून सरकारने वेळीच उपाययोजना करणे काळाची गरज आहे.

रामकृष्ण परब, कोमुनिदाद प्रतिनिधी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com