Goa School Problems: गोव्यातील 20% शाळांत एकच शौचालय, 13% विद्यार्थ्यांना वाटते असुरक्षित; सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती उघड

Goa School Toilet Issues: राज्‍यातील २० टक्‍के शाळांमध्‍ये मुले आणि मुलींसाठी एकच शौचालय असल्‍याचे तसेच १३ टक्‍के विद्यार्थ्यांना शाळेत असुरक्षित वाटत असल्‍याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.
Goa school toilet issues survey
Goa School ProblemsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील २० टक्‍के शाळांमध्‍ये मुले आणि मुलींसाठी एकच शौचालय असल्‍याचे तसेच १३ टक्‍के विद्यार्थ्यांना शाळेत असुरक्षित वाटत असल्‍याचे राष्‍ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) गतवर्षी केलेल्‍या ‘परख’ सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.

देशभरातील तिसरी, सहावी आणि नववीच्‍या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व्हेक्षण करण्‍यात आले होते. सर्व्हेक्षणात गोव्‍यातील २६९ शाळा आणि त्‍यातील ८६५ शिक्षक व ६,४६४ विद्यार्थी सहभागी झाले होते.

Goa school toilet issues survey
Heavy School Bag: मुलांच्या पाठीवर 'दप्तराचे' आणि डोक्यावर 'अभ्यासाचे' ओझे का वाढते आहे?

सर्वेक्षणानुसार, राज्‍यातील ८० टक्‍के शाळांमध्‍ये मुला आणि मुलींसाठी वेगवेगळी शौचालये आहेत, परंतु २० टक्‍के शाळांत मुला–मुलींसाठी एकच शौचालयाची सुविधा आहे. ७४ टक्‍के शाळांमध्‍ये विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्‍य मिळाले असून उर्वरित शाळांमध्‍ये क्रीडा साहित्‍याची वानवा आहे.

Goa school toilet issues survey
No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

विद्यार्थी, शाळांच्‍या तक्रारी (टक्‍क्‍यांत)

इतर विद्यार्थ्यांकडून छेडछाड : ३७

वर्गमित्रांनी गटातून वगळले : २५

मित्रांकडून चेष्‍टा : ३६

वर्गमित्रांकडून धमक्‍या : २५

वर्गमित्रांकडून मारहाण : २९

असुरक्षितता : १३

छळविरोधी धोरण नाही (शाळा) : २३

शिस्‍तीसंदर्भात धोरण नाही (शाळा) : ०३

लैंगिक छळविरोधी धोरण नाही (शाळा) : ११

विद्यार्थी संरक्षणाबाबत धोरण नाही (शाळा) : ०६

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com