Mapusa News: गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकाऱ्‍यांची बैठक, पार्किंगची समस्या सुटण्याची शक्यता

बसस्थानकामागील मोकळ्या जागेत वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध करून देण्याचा पर्याय शोधण्याचे निर्देश
Sub-District Officers
Sub-District OfficersDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News: गणेशचतुर्थी उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बार्देशचे उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी म्हापसा पालिकेला नवीन केटीसी बसस्थानकामागील मोकळ्या जागेत वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध करून देण्याचा पर्याय शोधण्याचे निर्देश दिले.

देसाई यांनी काल अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव आयोजकांनी तरुणांमध्ये जागृती करून गर्दीत किंवा लोकवस्तीच्या भागात फटाके वाजवू नयेत, असे आवाहन केले.

भाविकांनी त्यांची वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावीत. मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी म्हापसा पालिकेने नवीन केटीसी बसस्थानकामागील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. दुचाकी पार्किंगसाठी मार्केटच्या आजूबाजूला इतर पार्किंग क्षेत्रे पाहण्याची सूचनाही त्यांनी पालिकेस केली.

मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे ही सामाजिक समस्या आहे. त्यासाठी जागरुकता महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.

जेणेकरून त्यांनी मौजमजेसाठी फटाके फेकू नयेत. कारण यामुळे विशेषतः वृद्ध आणि मुक्या प्राण्यांना खूप समस्या निर्माण होतात, असेही देसाई म्हणाले.

Sub-District Officers
Mahadayi PRAWAH: गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकडून म्हादई प्रवाह प्राधिकरणावर सदस्यांची नियुक्ती

यावेळी म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांनी मुख्य बाजारपेठेत फटाके किंवा स्फोटकांच्या विक्रीला परवानगी देऊ नये, अशी सूचना केली. अग्निशमन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास फटाके स्टॉल्सना मार्केटच्या बाहेर परवानगी दिली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळा

नद्या आणि जलस्त्रोत प्रदूषित करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळण्याची गरजही देसाई यांनी व्यक्त केली. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि आपण या मूर्तींवर नियंत्रण ठेवायला हवे, असेही ते म्हणाले.

तसेच गणेश विसर्जनस्थळे पुरेशा प्रमाणात प्रकाशमान करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची सूचना त्यांनी वीज विभागास केली.

Sub-District Officers
Illegal Tenant Verification: राज्यातील हत्या सत्रानंतर भाडेकरू पडताळणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

उपजिल्हाधिकाऱ्यांचा सूचना

  • सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे भरून रस्ते चतुर्थी काळात योग्य स्थितीत असल्याची खात्री करावी.

  • सार्वजनिक मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे किंवा मंडपाभोवती खासगी सुरक्षारक्षक ठेवणे आवश्यक आहे.

  • रात्रीच्यावेळी पोलिस गस्त वाढवावी.

  • विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक परिसरातील व मार्गावरील दारूचे बार बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com