'वाघ आणि जंगलांपूर्वी येथे माणसे राहत होती', व्याघ्र प्रकल्पावरून दिव्या राणे कडाडल्या

मंत्री राणे : ‘गोवा फाऊंडेशन’वर टीका; प्रादेशिक आराखडा कालबाह्य
Tiger Project
Tiger ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

Vishwajit Rane व्‍याघ्र प्रकल्‍पासाठी एनजीओंना न्‍यायालयात जाणे सोपे असते. परंतु, सरकारला लोकांचा विचार करावा लागतो. व्‍याघ्रक्षेत्रप्रश्‍‍नी कायदा करून वा अन्‍य मार्गाने लोकांच्‍या हिताचे रक्षण करणार, असे वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी आज विधानसभेत स्‍पष्‍ट केले.

त्‍यांनी ‘गोवा फाऊंडेशन’च्‍या भूमिकेवरही टीका केली. त्‍यावर युरी आलेमाव, वेन्‍झी व्‍हिएगस यांनी आक्षेप नोंदवला.

सभागृहात नगरनियोजन, वन खात्‍यांच्‍या मागण्‍यांवर चर्चा झाली. यावेळी वनमंत्र्यांनी अनेक मुद्यांवर भाष्‍य केले. मंत्री राणे म्‍हणाले, ‘प्रादेशिक आराखडा २०२१’ आता कालबाह्य झाला.

प्रादेशिक आराखडा तयार करण्‍यासाठी जी समिती स्‍थापन झाली, त्‍यातील सदस्‍यांनी दिशाभूल केली, असे सांगत मंत्री राणे यांनी डीन डिक्रुज यांच्‍याकडे अंगुलीनिर्देश केला.

मोफत ‘आयव्‍हीएफ’ देणारे गोवा पहिले राज्‍य

दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळ ‘जीएमसी’सोबत जोडण्‍याचा प्रस्‍ताव आहे. या संदर्भात लवकरच सामंजस्‍य करार होईल. कोणतेही इस्‍पितळ खासगी होणार नाही. १४ ऑगस्टपासून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मोफत ‘आयव्हीएफ’ सुविधा सुरू होईल.

अशी सुविधा देणारे गोवा हे पहिले राज्‍य आहे. पालिका क्षेत्रातील प्रकल्‍पांच्‍या आराखड्यासाठी बनारस हिंदू विद्यापीठाशी करार होईल, असेही राणे म्‍हणाले.

मुख्‍यमंत्री व माझ्‍यात मतभेद नाहीत!

डॉ. प्रमोद सावंत राज्‍याचे मुख्‍यमंत्री आहेत. सरकारमध्‍ये नंबर१ वा नंबर२ असे काहीही नाही. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व माझ्‍यात कोणतेही मतभेद नाहीत. विरोधकांनी नाहक अफवा पसरवू नये, असे वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी स्‍पष्‍ट केले.

Tiger Project
Goa Assembly Monsoon Session : लोकप्रतिनिधींविरोधात 135 गुन्हे; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

विधानसभेत वनमंत्री म्‍हणाले...

1. व्‍याघ्र क्षेत्र वा प्रकल्‍पाची जे घटक मागणी करतात, त्‍यांना वस्‍तुस्‍थिती ठाऊक आहे का? म्‍हादई परिघात व्‍याघ्र प्रकल्‍प झाल्‍यास लोकांवर काय परिणाम होईल, याचा अभ्‍यास कुणीच केलेला नाही.

2. १९९९ साली कुणाकडूनही सूचना वा हरकती न घेता अभयारण्‍य जाहीर झाले. खंडपीठाने व्‍याघ्र क्षेत्र जाहीर करण्‍याचा आदेश दिला आहे. त्‍यावर अभ्‍यास करून नागरी हिताला सरकार प्राधान्‍य देईल.

Tiger Project
Goa Assembly Monsoon Session: जंगलांतील वणव्यांमागे बिल्डर लॉबीचाच हात!- विरोधकांचा हल्लाबोल

जंगलांपूर्वी माणसे होती :

म्हादई व्याघ्र प्रकल्पाला वनमंत्र्यांसह पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनीही आक्षेप नोंदवला आहे. जंगलात एखादा वाघ दिसला म्हणून तेथे व्याघ्र प्रकल्प होऊ शकत नाही. वाघ आणि जंगलांपूर्वी येथे माणसे राहात होती, असे सांगत दिव्या राणे यांनी विधानसभा अधिवेशनात व्याघ्र प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com