Honda Police Station: खिडक्यांना प्लास्टिक, सर्वत्र गळती, कुजलेले लाकूड सामान; होंडा पोलिस चौकी समस्यांच्या गर्तेत

कर्मचाऱ्यांचीही कमतरता
Honda Police Station
Honda Police StationDainik Gomantak

Honda Police Station: सत्तरी तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून गणल्या जाणाऱ्या पर्ये मतदारसंघातील होंडा पोलिस चौकीची अवस्‍था दयनीय झालेली आहे. कौले फुटल्‍याने गळती लागून लाकडाचे साहित्य भिजून व कुजून जात आहे.

बहुतांश सर्वच खिडक्यांच्या काचा तुटल्‍या आहेत. त्‍यामुळे पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी या खिडक्यांना प्लास्टिकचे कापड लावले आहे.

होंडा व पिसुर्ले पंचायत क्षेत्राला संरक्षण पुरविणाऱ्या या पोलिस चौकीवर सध्‍या दोन हवालदार, चार कॉन्स्टेबल व दोन होमगार्ड असे फक्त आठ कर्मचारी तैनात आहेत.

अलीकडे होंडा पंचायत क्षेत्राचा विकास झपाट्याने होत चालला आहे. बऱ्याच जुन्या सरकारी इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्‍या राहिल्‍या आहेत. मात्र होंडा पोलिस चौकीची स्‍थिती बिकट होत चालली आहे.

होंडा तसेच पिसुर्ले भागात वाढलेला औद्योगिक विकास आणि लोकसंख्या याचा विचार केल्यास या ठिकाणी सुसज्ज पोलिस स्थानक बांधणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी व्‍यक्त केले आहे.

फक्त होंडा पंचायत क्षेत्राचा विचार केला तर येथील लोकसंख्या दहा हजारांहून अधिक आहे. पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील लोकसंख्येतही वाढ होत आहे.

Honda Police Station
Goa Tourism: 'या' महत्वाकांक्षी योजनांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, पन्नास स्थानिक व्यावसायिकांना होणार लाभ

पोलिस चौकीची विभागणी तीन इमारतींमध्‍ये

होंडा पंचायत क्षेत्रात आतापर्यंत सरकारने बऱ्याच इमारतींच्या जागी नवीन इमारती बांधल्‍या, परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून होंडा-वाळपई रस्त्याच्‍या बाजूला असलेल्या या पोलिस चौकीच्‍या पुनर्बांधणीकडे लक्ष कसे काय जात नाही? असा संतप्‍त सवाल उपस्थित करण्‍यत येत आहे.

सदर पोलिस चौकी तीन इमारतींमध्ये विभागली गेली आहे. या इमारतींची उभारणी सुमारे चार-पाच दशकांपूर्वी केल्‍याचे सांगितले जाते. यातील शेवटच्या इमारतीच्या काही भागातील कौले फुटली असल्याने पावसाचे पाणी थेट खोलीत शिरते तर लाकडी साहित्य भिजून खराब होत आहे.

Honda Police Station
Road Issue In Saleli, Goa: वीज खात्याच्या 'त्या' प्रकारामुळे रस्ते धोकादायक, सालेली ग्रामस्थ हैराण

होंडा व पिसुर्ले पंचायत क्षेत्रात काही वेळा गंभीर स्वरूपाचे प्रकरण घडल्यास ते हाताळण्यासाठी तक्रारदार व फिर्यादीला सहा-सात किलोमीटरचे अंतर कापून वाळपई पोलिस स्‍थानकावर जावे लागते. आमदार डॉ. दिव्या राणे यांनी होंडा पोलिस चौकीच्‍या इमारतीबाबत सविस्तर माहिती मागवून घेतली आहे. त्‍यामुळे लवकरच या चौकीला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा आहे.

- शिवदास माडकर, होंडा सरपंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com