अभिमानास्पद! गोमंतकीय कथाकार डॉ. प्रकाश पर्येकरांच्या ‘आर्या’ सिनेमाची बॉलीवूड चित्रपट महोत्सवामध्ये निवड

बॉलीवूड चित्रपट महोत्सवात निवड : नॉर्वेत होणार प्रदर्शन; दिग्गज हिंदी चित्रपटांच्या यादीत समावेश
Aarya Film
Aarya FilmDainik Gomantak
Published on
Updated on

Aarya Film सत्तरीचे सुपुत्र, नामवंत लेखक, कथाकार डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या ‘सैम सोबित नेहा’ या कोकणी कथेवर आधारित ‘आर्या : डॉटर ऑफ भारत’ या मराठी चित्रपटाची नॉर्वे येथील बॉलीवूड चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाली आहे.

स्वातंत्र्यदिनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. ‘एसएस’ फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, पुणे येथील शरद आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीन भास्कर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.

ग्रामीण जीवन आणि लोकसंस्कृतीचे दर्शन या चित्रपटातून होते. वीरभद्र, रणमाले, शिगमोत्सव, चोरोत्सव, रोमटामेळ आदी लोककलांचाही त्यात समावेश आहे.

२२ दिवसांच्या या चित्रीकरणात सत्तरीतील रिवे, गोळावली, पाली, ठाणे, धावे, तार, जुने गोवे, ताळगाव, दोना पावला, पणजी या भागांचा समावेश आहे. चित्रपटाची पटकथा डॉ. प्रकाश पर्येकर आणि श्रीकांत भिडे आहे.

Aarya Film
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा-पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; वाचा आजचे ताजे दर

गोमंतकीय कलाकारांचा सहभाग

या चित्रपटात ‘आर्या’ या मुलीची भूमिका हिरिका पाटील (पुणे), आईची भूमिका अभिनेत्री अमृता फडके, मुंबईचे राहुल बोडस (वडील), शीतल सोनावणे, शुभांगी दामले, शशांक शेंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच श्वेता कर्पे, माधुर्य मोरजकर, कवीश बेतकीकर, अदिती कुंभार, सानवी माशेलकर, सृष्टी गावकर, वेदा देसाई, मेघा हळदणकर, श्वेता गडकर, विवेक शिरवईकर, नविता गावस, विश्वनाथ गावस या गोमंतकीय कलाकारांची झलक पाहायला मिळणार आहे.

Aarya Film
Kadamba Bus Corporation: तोट्यात चालणाऱ्या 'KTC'ला सावरण्याचा प्रयत्न निष्फळ, ऊर्जा विकास यंत्रणेच्या 'त्या' सल्ल्याकडे महामंडळाचा कानाडोळा

हा चित्रपट माझ्या जीवनावर आधारित आहे. सप्टेंबरमध्ये नाॅर्वेतील महोत्सवात गोव्याचा हा चित्रपट दाखविला जाणार असल्याने खूप आनंद होत आहे. इफ्फीतही ‘इंडियन पॅनोरमा’ विभागासाठी आम्ही तो पाठविला आहे. निवड झाल्यानंतर या चित्रपटाचा प्रीमियर इफ्फीत करणार आहोत. - प्रकाश पर्येकर, लेखक-कथाकार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com