Goa: मच्छिमार होड्यांच्या मोटर चोरी प्रकरणात चोरटा गजाआड

संकेत चोडणकर (Sanket Chodankar) याना 13 रोजी अटक केली व 3 लाख आठ हजार किमतीचे मोटार इंजिन जप्त केली.
Sanket Chodankar
Sanket ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे पोलिसांनी (Pedne Police) किनारी भागातील मच्छिमार होड्यांच्या मोटर चोरी प्रकरणी चोराव तिसवाडी येथील संकेत चोडणकर (Sanket Chodankar) याना 13 रोजी अटक केली व 3 लाख आठ हजार किमतीचे मोटार इंजिन जप्त केली. पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी (Pedne Police Inspector Jivba Dalvi) यांनी दिलेल्या माहिती नुसार 10 रोजी केरी धाकटेबाग येथील रोहन पेडणेकर (Rohan Pednekar) यांनी आपल्या होडीचा मोटार चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस टीम तयार केली, व काही ठिकाणी सीसीटीव्ही चित्रीकरण घेतले , त्यात संशयीची ओळख पटली .पोलिसांनी जाळे टाकून त्याना शिताफीने पकडले, त्याच्या घरातुंन दुसऱ्या एका मोटारचे इंजिन जप्त केले.

Sanket Chodankar
Goa Monsoon Update: पिसुर्लेत घर कोसळले, पावसाचा तडाखा कायम

दरम्यान मागच्या दीड वर्षापासून मोरजी . मांद्रे हरमल व केरी या ठिकाणचे मच्छीमार बांधव व्यावसायिकांचे किमान १० ते बारा मोटार चोरीला गेले आहे , त्याविषयी तक्रारीही दिल्या मात्र आजपर्यत त्या मोटार यंत्रांचा पत्ता लागला नाही , त्यामुळे व्यावसायिक नाराजी व्यक्त करत होते पेडणे पोलिसांनी संदेश चोडणकर या चोरट्याला अटक केली आहे , इतर १० बारा चोरीला गेलेल्या मोटारांचा तपास लावावा अशी मागणी होत आहे, पकडलेल्या चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी हे पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई व अधीक्षक सोबीत सक्षेना (Sobit Sakshena) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com