Sanjivani Sugar Factory मागील काही दिवसांपासून राज्यात संजीवनी साखर कारखान्याचा विषय गाजत असून संजीवनी धारबांदोडा येथे उद्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. संजीवनी सहकारी साखर कारखाना पूर्ववत चालू करणे, ऊस शेतीला प्राधान्य देणे आणि ऊस उत्पादकांना नुकसान भरपाईची रक्कम वेळेवर देणे या प्रमुख मागण्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे.
सरकार कारखाना बंद करू इच्छित असल्याने प्रत्येकवेळी उत्पादक आपला ऊस इतर राज्यातील कारखान्यांना कसा काय पुरवणार? असा सवाल हर्षद प्रभुदेसाई यांनी याआधी उपस्थित केला होता. तसेच इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया प्रलंबित असून इतर समस्यांकडेही सरकारने दुर्लक्ष केल्याचे उत्पादकांचे म्हणणे होते.
तर कारखान्यातील कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने कामगारांत नाराजी पसरली आहे. 22 वर्षांपासून कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.