Sanjivani Sugar Factory
Sanjivani Sugar FactoryDainik Gomantak

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी' कामगारांचा इशारा; पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता
Published on

Sanjivani Sugar Factory मागील काही दिवसांपासून राज्यात संजीवनी साखर कारखान्याचा विषय गाजत असून संजीवनी धारबांदोडा येथे 17 जुलैला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली.

संजीवनी सहकारी साखर कारखाना पूर्ववत चालू करणे, ऊस शेतीला प्राधान्य देणे आणि ऊस उत्पादकांना नुकसान भरपाईची रक्कम वेळेवर देणे या प्रमुख मागण्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संप पुकारला होता.

Sanjivani Sugar Factory
Goa Monsoon 2023: पावसामुळे पडझडीच्या घटनांत वाढ; बागा येथे कारसहित दुचाकीवर झाड कोसळले

दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. दुपारी आंदोलक महामार्गावर जमू लागल्यानंतर पोलिसांनी वाहतुकीस अडतळा होऊ नये, यास्तव आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले.

संजीवनी सहकारी साखर कारखान्यात काम करणारे कंत्राटी व कायम कामगारांना जो पर्यंत पगार मिळत नाही तो पर्यंत आम्ही कामकाज बंद ठेवणार असल्याचा एल्गार संजीवनी कामगारांनी केला आहे.

यावेळी कारखान्यातील स्त्री-पुरुष कामगारांनी कारखान्याबाहेर एकत्र जमून घोषणाबाजी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com