Goa Latest News: 'सांगेचे नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांच्यावर तडीपाराची नोटीस मागे घ्यावी' - सावित्री कवळेकर

Goa Latest News: पत्रकार परिषदेद्वारे सांगेतील जनतेची मागणी
Savitri Kavalekar |Goa News
Savitri Kavalekar |Goa NewsDainik Gomantak

Savitri Kavalekar: सांगेचे नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांच्यावर तडीपार करण्याची नोटीस प्रशासनाने बजाविली आहे. ती नोटीस मागे घ्यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली.

सांगे नगरपालिकेचा वार्ड दोन मधील नगरसेवक मेशू डिकॉस्ता हे नेहमीच जनतेच्या बाजूने झगडणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांचे कोणाशीही भांडण नाही, अन्यायाविरोधात ते आवाज उठवितात. तेव्हा त्याच्याबाबतचा तडीपारीचा निर्णय मागे घ्यावा, असे मत कोस्ताव मास्कारेन्हास यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Savitri Kavalekar |Goa News
Sanguem IIT controversy: सांगे आयआयटीची धग शमेना; आता दांडो ग्रामस्थांचा प्रकल्पाविरोधात एल्गार

सातन रॉड्रिगीस म्हणाले, मेशू डिकॉस्ता हे गावाच्या विकासासाठी सतत आवाज उठवितात, तो आवाज दाबण्यासाठी तडीपार सारखी नोटीसचा प्रशासनाने फेरविचार करावा.

जोसेफ फेर्नांडिस म्हणाले, तडीपार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जनतेची सहमती घ्यावी लागते. सरकारने तसे केले काय? सामाजिक कार्यासाठी आवाज काढणाऱ्यांना प्रशासनाकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

न्यायव्यवस्थेवर विश्‍वास : कवळेकर

नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांच्या विरुद्ध प्रशासनाने जी तडीपार नोटीस बजाविली आहे. त्यातून नक्कीच न्याय मिळणार असून आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. सांगेतील जनता नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांच्या पाठीशी आहे, असे सावित्री कवळेकर म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com