Panchayat
PanchayatDainik Gomantak

Sangolda Panchayat: सांगोल्डा उपसरपंचांची हकालपट्टी

Sangolda Panchayat: १६ लाखांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अपात्रता
Published on

Sangolda Panchayat: सांगोल्डाचे उपसरपंच उल्हास मोरजकर यांनी १६.१० लाख रुपयांचा कथित घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्याने पंचायत संचालनालयाने त्यांना या पदावरून हटवण्याचा आदेश जारी केला. त्याचप्रमाणे, त्यांना पंचसदस्य म्हणूनही अपात्र ठरविले.

या आदेशामुळे आता सांगोल्डा पंचायतीच्या प्रभाग ७ मध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय, १९ मे २०२६पर्यंत मोरजकर यांना निवडणूक लढता येणार नाही.

उपलब्ध माहितीनुसार, याप्रकरणी सांगोल्डातील आनंद तुळसकर यांनी उल्हास मोरजकर यांच्याविरुद्ध पंचायत संचालनालयाकडे तक्रार केली होती.

यावेळी दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी वरील आदेश दिला.

मे २०२१ ते जून २०२२ या कालावधीत पंचसदस्य उल्हास मोरजकर यांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश सांगोल्डा पंचायत सचिवांना दिलेले.

Panchayat
Pallavi Dempo: दामबाबांच्या चरणी 'पल्लवी'; शेकडो भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती

त्यानुसार, तपासणीत मोरजकर यांनी एकूण १६.१० लाखांचा कथित घोटाळा केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही रक्कम त्यांच्याकडून व्याजासह वसूल करावी, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

दरम्यान, हे आरोप बिनबुडाचे असल्याचे प्रतिवादी मोरजकर यांनी म्हटले. मात्र तसे ठोस पुरावे ते सादर करु शकले नाहीत.

त्यामुळे सुनावणीनंतर पंचायत संचालकांनी तुळसकर यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे नमूद करत मोरजकरांना उपसरपंच पदावरुन हटवत, पंचसदस्य म्हणूनही अपात्र ठरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com