Samagra Shiksha Scam: समग्र शिक्षा घोटाळा! बँकेकडून मिळणार 4.87 कोटी; पश्‍चिम बंगालमधील आणखी चौघांना अटक

Goa Samagra Shiksha Scam: गोवा समग्र शिक्षा अभियानाचा निधी ज्‍या बँकेत जमा होतो, त्‍यात सुमारे ४.८७ कोटींचा घोटाळा झाल्‍याचे समोर आल्‍यानंतर राज्‍याच्‍या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली होती.
Notes
Indian RupeesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍य समग्र शिक्षा अभियानात झालेल्‍या घोटाळ्यातील सुमारे ४.८७ कोटींची रक्कम परत करण्‍याची हमी बँकेने दिल्‍यानंतर अभियानचे संचालक शंभू घाडी यांनी त्‍यासंदर्भातील प्रक्रिया सुरू केली आहे. ही रक्कम उद्या शुक्रवारपर्यंत बँकेत जमा होईल, असे घाडी यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

गोवा समग्र शिक्षा अभियानाचा निधी ज्‍या बँकेत जमा होतो, त्‍यात सुमारे ४.८७ कोटींचा घोटाळा झाल्‍याचे समोर आल्‍यानंतर राज्‍याच्‍या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली होती. संचालक घाडी यांनी याबाबत पर्वरी पोलिस स्‍थानकात तक्रार दाखल केल्‍यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू करून प्रथम पश्चिम बंगालमधील कापड व्यावसायिक रॉबिन एल. पॉल याला अटक केली होती.

अभियानाच्‍या निधीतून १.८ कोटींची रक्कम पॉल याच्‍या बँक खात्‍यात वळवल्‍यात आली होती. त्‍यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पश्‍चिम बंगालमधीलच आणखी चौघांना अटक केली असून, त्‍यांची चौकशी सुरू आहे.

Notes
Goa Land Scam: भविष्यात गोव्यातील लोकांकडे 'पैसा' असेल, पण स्वत:ची 'जमीन' व 'गोंयकारपण' असणार नाही..

संबंधित बँकेने घोटाळा झालेली रक्कम स्‍वत: अभियानच्‍या खात्‍यात जमा करण्‍याची हमी दिल्‍यानंतर अभियानने ही प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झाली आहे.

Notes
Cyber Fraud: एक क्लिक अन् आयुष्यभराची बचत गायब! सायबर हल्ले थांबणार कधी? कुणी सुरक्षा देता का?

बनावट धनादेशसुद्धा केले होते तयार

या प्रकरणात गोवा सर्व शिक्षा अभियानाचे बोगस धनादेशही तयार करण्यात आले होते. त्यावर शंभू घाडी आणि अभियानच्या लेखा विभागाच्या खोट्या स्‍वाक्षऱ्या होत्‍या. गोवा समग्र शिक्षा अभियानाच्या खात्याची संपूर्ण माहिती संबंधित बँकेकडेच असल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांकडूनही हा घोटाळा होऊ शकतो, असा संशय अभियानने त्‍यावेळी व्‍यक्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com