Goa: गोव्यातील ग्रामीण भागामध्ये खेळाडूंसाठी चांगल्या प्रकारच्या क्रीडा सुविधा करणार उपलब्ध- दिव्या राणे

Goa: अखिल गोवा पातळीवर फ्लड लाईट क्रिकेट स्पर्धेच्या उद्‍घाटन समारंभात त्या बोलत होत्या.
Goa | Deviya Rane
Goa | Deviya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: पर्ये मतदारसंघाच्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या प्रकारच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून मुलांना प्रोत्साहीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पर्ये मतदारसंघाचे आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी केले.

ठाणे - सत्तरी येथील नवदुर्गा स्पोर्ट्स क्लबच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात व अखिल गोवा पातळीवर फ्लड लाईट क्रिकेट स्पर्धेच्या उद्‍घाटन समारंभात त्या बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, सरपंच सरिता गावकर, पंच विनायक गावस, नीलेश परवार, तनया गावकर, उत्तम गावकर, पांडुरंग गावकर, अनुष्का गावकर, सुभाष गावडे, सुरेश आयकर, दिकेश नाईक, चंदन नाईक, उदय सावंत, झिलबाराव देसाई, नंदा गावकर, फटगो गावकर, प्रेमकुमार गावकर उपस्थित होते.

Goa | Deviya Rane
Santa Cruz Goa: अखेर सांताक्रुझ पंचायत घरांच्या पायाभरणीसाठी लागला मुहूर्त!

याप्रसंगी विनोद शिंदे यांनी सांगितले, की ठाणे पंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची गरज आहे. त्यासाठी सत्तरी तालुक्यातील दोन्ही आमदार विशेष प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आतापर्यंत निर्माण झालेल्या आहेत.

येणाऱ्या काळात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दोन्ही आमदारांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. सध्या विकासाच्या माध्यमातून वाळपई व पर्ये मतदारसंघांमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे. आमदार डॉ. दिव्या राणे यांना सहकार्य केल्यास पुढील चार वर्षांमध्ये पर्ये मतदारसंघाचा चेहरा बदलणार आहे.

वाळपई मैदानाचे आज उद्‍घाटन

मंडळगिरो - ठाणे येथे सुसज्ज मैदान होणार असून तेथे विजेची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात मुलांना दिवस-रात्र खेळण्याची चांगली संधी या ठिकाणी प्राप्त होणार आहे. या मैदानाचा लाभ सात गावांतील खेळाडूंना होणार आहे.

आज वाळपई नगरपालिका क्षेत्रात विविध सुविधांयुक्त उभारण्यात आलेल्या मैदानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तशाच प्रकारची मैदाने पर्ये मतदारसंघातील पंचायत क्षेत्रामध्ये उभारण्यासाठी सरपंच व पंच मंडळाने जागेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com