कुजके बटाटे
कुजके बटाटे Dainik Gomantak

काणकोण येथे शाळांमध्ये मध्यान्ह आहार योजनेत मुलांना कुजके बटाटे

कुजक्या बटाटयांचे काय करायचे, असा काणकोण तालुक्यातील शाळा चालकांना प्रश्न

Goa: मध्यान्ह आहार (Lunch) योजने अंतर्गत शिक्षण खात्यातर्फे देण्यात येणारे बटाटे कुजलेले (Rotten potatoes) तर वाटाणे न शिजणारे असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काणकोणमधील बहुतांश शाळाचालकांची हीच तक्रार आहे. पुरवठादारांनी पुरवठा केलेल्या ३० किलो वजनाच्या बटाटाच्या गोणीत सुमारे पाच किलो कुजलेले बटाटे सापडत आहेत त्यामुळे ही तूट कोणी भरून काढायची हा प्रश्न शाळा चालकांना पडला आहे.

कुजके बटाटे
52वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर रोजी

पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहारा अंतर्गत बटाटे, गंहू, वाटाणे व तेलाचा पुरवठा स्वंयसहाय्य गटाअंतर्गत करण्यात आला आहे. शिक्षण खात्याने पूर्वी या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठी त्याचा बॅक अकाउंट तपशील मागून घेतला होता, मात्र आता शिक्षण खात्याने आपला निर्णय बदलून मध्यान्ह आहारासाठी विद्यार्थ्यांना सामान देण्याचे धोरण अवलंबिले आहे.

कुजके बटाटे
समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनार्थ साहित्यिकांची भुमिका महत्वाची

या योजनेअंतर्गत पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पांच किलो गहू, तीन किलो बटाटे,एक किलो वाटाणे,सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सात किलो गंहू,पांच किलो बटाटे व दोन किलो वाटाणे तसेच पहिली ते आठवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा लिटर खाद्य तेल देण्यात येत आहे. या कुजक्या बटाटाचे काय करायचे हा प्रश्न काणकोण तालुक्यातील सर्व शाळा चालकाना सतावत आहे.काहीनी काणकोण तालुका शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com