Goa Accident: अपघात सत्र सुरूच, भरधाव कारने दोन दुचाकींना ठोकरले; महिला मृत्‍युमुखी

बंगळुरू येथील कारचालक अखिलेश झांद्याला या युवकाला अटक केली
Car Accident
Car AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident: साखळी-हाऊसिंग बोर्ड नजीक भरधाव कारने बुलेटसह अन्य एका दुचाकीला धडक दिल्‍याने पोस्तवाडा-होंडा येथील गिजीमोल नायर (45) या महिलेचा मृत्‍यू झाला; तर दोन दुचाकीस्‍वार जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री उशिरा झाला.

केए-01-एमएक्स-4113 या क्रमांकाची कार साखळीहून होंडाच्या दिशेने जात होती. बोर्ड येथे पोहोचताच बुलेटला जोरदार धडक बसली. त्‍यात बुलेटचालक अजितकुमार नायर आणि त्यांची पत्नी गिजीमोल हे रस्त्यावर पडले.

त्‍याचवेळी कारने पुढे जाऊन अन्‍य एका दुचाकीला धडक दिली. त्‍यात हुसेन आदम खान (रा. हरवळे) हे जखमी झाले. तिघांना साखळी इस्पितळात नेण्यात आले. गिजीमोल यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

Car Accident
Mayem Biodiversity Map: मयेचा समग्र इतिहास दर्शवणारा माहितीपट अखेर सर्वांसमोर..

कारचालक युवकाला अटक

हवालदार प्रसाद बायेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 279, 337 आणि 304 (ए) या कलमान्वये गुन्हा दाखल करून बंगळुरू येथील कारचालक अखिलेश झांद्याला या युवकाला अटक केली.

पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रसाद पाळणी पुढील तपास करीत आहेत.

Car Accident
200 रूपये भरा आणि पक्षाचे सदस्य व्हा; RG ला लोकसभा निवडणुकीसाठी हवे 2.5 कोटी, मनोज परबांचे जनतेला आवाहन

दरम्यान सोमवारी मध्यरात्री पर्वरीत एका थार कारने दुचाकीला फरफटत नेल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघातात जखमी दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आज साखळी येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com