रिव्हॉल्युशनरी गोवन पार्टीच्या वतीने पक्षाची सदस्यत्व मोहीम सुरू केली आहे. पक्षाचे संकेतस्थळ देखील आज लॉन्च करण्यात आले. संकेतस्थळावर पक्षाच्या वतीने केलेल्या आणि सुरू असलेल्या कामाची माहिती मिळेल.
संकेतस्थळाचा मुख्य उद्देश पक्षाचे सदस्य होण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आहे. असे पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी सांगितले.
वार्षिक 200 रूपये फी
रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे सदस्य होण्यासाठी वार्षिक दोनशे रूपये सदस्यत्व फी भरावी लागणार आहे. अशी माहिती मनोज परब यांनी दिली. तसेच, यावेळी एक मोबाईल नंबर जाहीर करण्यात आला ज्यावर मिसकॉल दिल्यास संबधित नागरिकाला एक लिंक देण्यात येईल ज्यावरून लोकांना सदस्य होता येईल.
पक्षाकडे किती फंड आला आणि किती खर्च झाला?
विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पक्षाकडे 9 ते 10 लाख बँकेत शिल्लक असल्याची माहिती मनोज परब यांनी यावेळी दिली. तर, त्यानंतर पक्षाकडे जमा झालेला फंड सहा लाख 70 हजार एवढा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. असा एकूण 16 लाख फंड पक्षाकडे गोळा झाला, त्यापैकी 13 लाख 33 खर्च झाले आणि सध्या 2 लाख 40 हजार शिल्लक उरल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अनेक लोकांना आरजी पक्षाकडे अधिक पैसे असल्याचे वाटते पण, मागील दीड वर्षात पक्षाकडे केवळ सहा लाख रूपये आले. त्यातील पैसे कार्यालयाचे भाडे यासह इतर कामांसाठी खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अलिकडे आरजीने राज्यातील दोन्ही लोकसभा निवडणूका लढविण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी दोन कोटी 49 लाख रूपये आवश्यक असल्याचे आम्हाला दिसून आले. तर, महिन्याला सतरा लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे 10 ते 15 हजार लोकांनी महिन्याला केवळ 100 रूपये दिले तर रक्कम सहज गोळा होऊ शकते. असा हिशोब परब यांनी सांगितला
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.