Revolutionary Goans: 'आरजी- ढवळीकर वाद' राज्यपालांसमोर; रिव्होल्यूशनरी गोवन्सने राज्यपालांकडे केलीय 'ही' मागणी

Revolutionary Goans: आरजीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मंत्री सुदीन ढवळीकरांमध्ये शाब्दीक चकमक उडाली होती.
Revolutionary goans
Revolutionary goansDainik Gomantak

Revolutionary Goans:

गोवा सरकारच्यावतीने राज्यात 'पंचायत चलो' अभियान राबविले जात असून या अभियानाअंतर्गत राज्यातील मंत्री विविध पंचायतीत जाऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासह सरकारी योजना आणि सुविधांची माहिती पोहोचवत आहेत.

या अभियानादरम्यान मडकईत मंत्री विश्वजीत राणे यांच्या दौऱ्यावेळी आरजीचे कार्यकर्ते आणि मंत्री सुदीन ढवळीकर यांच्यात तू- तू-मैं -मैं झाली.

त्यांनतर आरजीकडून याप्रकरणी मंत्री सुदिन यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

आता या प्रकरणी रिव्होल्यूशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी विश्वेश नाईक, रूबर्ट परेरा यांच्यासोबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची राजभवनावर भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

बांदोडे येथे पंचायत चलो अभियाना दरम्यान झालेल्या वादाची माहिती राज्यपालांना देण्यात आली आहे.

या भेटीदरम्यान बोरकर यांनी सुदिन ढवळीकर यांच्यावर रितसर कारवाई करण्याची मागणी राज्यपालांकडे केली. मात्र राज्यपाल पिल्लई यांनी या प्रकरणाविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे आश्वासन बोरकर यांना दिले आहे.

दरम्यान मडकईत 'पंचायत चलो' अभियानावेळी मंत्री विश्वजीत राणेंना नगरनियोजन विभागाचे कलम 39ए वरुन प्रश्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरजीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मंत्री सुदीन ढवळीकरांमध्ये शाब्दीक चकमक उडाल्यानंतर वाद एवढा टोकाला गेला की यावेळी एकामेकांच्या अंगावर देखील जाण्याचा देखील प्रयत्न झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com