Republic Day Award 2024: उद्या म्हणजेच 26 जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून याचबाबत गोव्यासाठी अभिमानाची आणि महत्वाची बातमी हाती येतेय.
वाहतूक पोलीस विभागाचे उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना यंदाचे विशिष्ट राष्ट्रपती सेवा पदक जाहीर झाले आहे.
उद्या दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
याशिवाय एमटी विभागाचे पोलीस उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षक विभागाचे पोलीस उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.
पोलीस दलातील या अधिकाऱ्यांना जाहीर झालेल्या या पदकांमुळे ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट बनली आहे. तसेच पोलीस दल करत असलेली उत्कृष्ट कामगिरी या माध्यमातून समोर येतेय.
देशभरात 1,132 पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
राष्ट्रपती पदक 102 जणांना तर 753 जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
त्याच प्रमाणे दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी गोव्याचा भारतपर्व नावाचा चित्ररथ सहभागी झाला असून याबाबतही काही माहिती समोर आली आहे.
प्रजासत्ताकदिनी होणारे पथसंचलन हे देशातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांपैकी एक मानले जाते. अशा या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये आपले संचालन दाखवण्यासाठी गोव्याचा चित्ररथ दिल्लीत दाखल झाला आहे.
भारतपर्व हा चित्ररथ विकसित गोवा, विकसित भारत या संकल्पनेवर आधारित आहे. सागरी जीवन आणि जल जीवन मिशन असे देखावे आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.