Goa: खासगी वाहनांमुळे रेंट ए कॅबला फटका; कारवाईची मागणी

‘रेंट ए कॅब’ या व्यवसायावर अनेक गोमंतकीयांची कुटुंबे अवलंबून आहेत.
Goa Rent a Cab
Goa Rent a CabDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात (Goa) मोठ्या प्रमाणात खासगी वाहने पर्यटकांना (Tourism) भाडेपट्टीवर दिली जात आहेत. त्यामुळे ‘रेंट ए कार’ व्यवसाय (Rent a car) डबघाईस आला आहे. या खासगी वाहनांविरुद्ध वाहतूक तसेच पोलिस अधिकाऱ्यांकडूनही कारवाईबाबत डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे सरकारने (Goa Government) या प्रकरणावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी रेंट ए कॅब असोसिएशनने (Rent a cab) केली आहे.

या असोसिएशनने वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्यात बेकायदेशीरपणे वाहने भाडेपट्टीवर देण्याबाबत सुरू असलेल्या प्रकरणाकडे लक्ष वेधले व कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रामदास पालकर म्हणाले, की नियमानुसार ‘रेंट ए कॅब’साठीचे असलेले सर्व कर तसेच विमा वेळेवर भरण्यात येतात. ही रक्कम खासगी वाहनांपेक्षा अधिक आहे.

Goa Rent a Cab
Mopa: "Casinoला लोकांचा असेल, तर माझाही विरोधच"

मात्र, अनेक खासगी वाहनचालक कमी किंमतीला भाडेपट्टीवर वाहने देत आहेत. त्यामुळे आमच्या कायदेशीर सुरू असलेल्या रेंट ए कॅब या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. गेल्यावर्षीपासून कोविड महामारीमुळे राज्यातील ‘रेंट ए कॅब’ व्यवसाय आधीच कमी झाला आहे. त्यामुळे सरकारकडून कोणतेही सहाय्य मिळालेले नाही. दरवर्षी विमा भरावा लागतो तसेच वाहनाच्या कर्जाचे हप्ते बँकेत वेळेवर जमा करावे लागतात. अशा स्थितीत खासगी वाहनमालकांनी आमचा व्यवसाय बेकायदेशीरपणे ‘हायजॅक’ केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Goa Rent a Cab
Goa: कर्नाटकने यंदाही म्हादईचा गळा घोटलाच

‘खासगी वाहने जप्त करा’

‘रेंट ए कॅब’ या व्यवसायावर अनेक गोमंतकीयांची कुटुंबे अवलंबून आहेत. आधीच महामारीमुळे व्यवसाय कमी असताना खासगी वाहनांविरुद्ध कडक कारवाईसाठी पावले उचलली जात नसल्याने त्यांचे फावले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे, अशावेळी काहीजण खासगी वाहने भाडेपट्टीवर देऊन आमचा व्यवसाय हिरावून घेत आहेत. अशा वाहन मालकांना वचक बसवण्यासाठी पोलिस व वाहतूक अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलून त्यांची वाहने जप्त करण्यात यावीत अशी विनंती रेंट ए कॅब असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com