'सेफ गोवा, हॅप्पी गोवा!' 5 लाख पर्यटकांची महागर्दी; नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याचे किनारे पर्यटकांनी ओसंडून वाहणार

Goa New Year Tourism: येत्या ३१ डिसेंबरपर्यंत गोव्यात किमान ५ लाख पर्यटक दाखल होतील, असा अंदाज गोवा पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे
Goa holiday destination
Goa holiday destinationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism Boom for New Year 2026: सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ चे स्वागत करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला असताना, पर्यटकांची पहिली पसंदती पुन्हा एकदा गोव्याला मिळालीये. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत गोव्यात किमान ५ लाख पर्यटक दाखल होतील, असा अंदाज गोवा पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ६ डिसेंबर रोजी हडफडे येथील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू होऊनही, गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही.

"गोवा एक सुरक्षित ठिकाण"

पर्यटन संचालक राज्य पर्यटन संचालक केदार नाईक यांनी पीटीआय या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "गोवा हे पर्यटनासाठी पूर्णपणे सुरक्षित राज्य आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही विमान फेऱ्या रद्द झाल्यामुळे पर्यटकांची संख्या थोडी कमी होती, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे सुधारलीये. रशिया आणि ब्रिटनमधून नियमित चार्टर्ड विमाने गोव्यात येत असून, मार्चपर्यंत ही संख्या वाढतच राहणार आहे."

उत्तर ते दक्षिण... सर्व किनारे हाऊसफुल्ल!

उत्तर गोव्यातील कळंगुट आणि बागा यांसारख्या प्रसिद्ध किनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. तर दक्षिण गोव्यातील बाणावली, माजोर्डा, कोलवा आणि पालोळे या किनाऱ्यांवरही पर्यटकांनी गर्दी केली आहे.

केवळ समुद्रकिनारेच नव्हे, तर गोव्याचे अंतर्गत भाग (Hinterland) पाहण्यासाठीही पर्यटक उत्सुक आहेत. कोल्हापूर, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांतून येणाऱ्या देशी पर्यटकांनी गोव्यातील शॅक्स, रेस्टॉरंट्स आणि फ्ली मार्केट्स गजबजून गेले आहेत.

Goa holiday destination
Goa Tourism: 'पर्यटनावर हडफडे दुर्घटनेचे सावट नाही; परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ', मंत्री खवंटेंचा मोठा खुलासा

पहाटेपर्यंत रंगणार पार्ट्यांचा धुरळा ३

१ डिसेंबरच्या मध्यरात्री गोव्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर फटाक्यांची भव्य आतषबाजी केली जाणार आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील 'शॅक्स'चे रूपांतर आता हाय-एनर्जी पार्टी झोनमध्ये झाले असून, तिथे पहाटेपर्यंत संगीताचा ठेका धरणार आहे.

याशिवाय, क्रूझ बोटींवरील विशेष सफर, म्युझिक फेस्टिव्हल्स आणि क्लब इव्हेंट्समुळे गोवा एका मोठ्या 'ओपन-एअर पार्टी व्हेन्यू'मध्ये रूपांतरित झाले आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्ससाठीही गोवा सध्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com