Goa Crime: पुनर्वसन केंद्रातून अपहरण झालेली 13 वर्षीय मुलगी अडीच महिन्यांनंतर दिल्लीत सापडली, दुसरी अद्याप बेपत्ताच

Goa Rehab Center Abduction: थिवी बार्देश येथील नवज्योती पुनर्वसन केंद्रातून १३ आणि १५ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते.
One girl found another still missing after abduction
13-year-old abducted from rehab center found in DelhiDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: पुनर्वसन केंद्रातून अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींपैकी एक मुलगी तब्बल अडिच महिन्यानंतर दिल्ली येथे सापडली असून, दुसरी मुलगी अद्याप बेपत्ताच आहे. कोलवाळ पोलिसांनी दिल्लीतून मुलीचा शोध घेऊन पोलिस स्थानकात हजर केले. दरम्यान, दुसऱ्या मुलीचा शोध अद्याप सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माडेल, थिवी बार्देश येथील नवज्योती पुनर्वसन केंद्रातून १३ आणि १५ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी ३० जानेवारी रोजी योगिनी लोप्स (४८) यांनी कोलवाळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी यावरुन भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) आणि गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंद केला.

One girl found another still missing after abduction
Mapusa: इस्टरच्या नावाखाली दारु, तंबाखू आणि मोठ्याने संगीत लावून पार्टी; म्हापसा स्थानकावर उघड्यावर मद्यपान, वाईन शॉप्सना नोटीस

पोलिसांनी विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने अपहरण करण्यात आलेल्या मुलींचा शोध घेण्यास सुरवात केली. दरम्यान, १३ वर्षीय मुलीचा शोध दिल्लीत लागला, मुलीला सुखरुपपणे कोलवाळ पोलिस स्थानकात हजर करण्यात आले. पण, १५ वर्षीय दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता असून, तिचा शोध घेतला जात आहे.

पोलिस निरीक्षक विजय राणे, पोलिस उपनिरिक्षक दत्ताराज राणे, पोलिस कॉन्स्टेबल गौरेश शेट्ये, शामल चारी, अनिता शकलकर यांच्या टीमने उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल आणि एसडीपीओ आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com