Mapusa: इस्टरच्या नावाखाली दारु, तंबाखू आणि मोठ्याने संगीत लावून पार्टी; म्हापसा स्थानकावर उघड्यावर मद्यपान, वाईन शॉप्सना नोटीस

Mapusa Crime: कार्यक्रमाऐवजी मद्यपान, तंबाखू सेवन आणि मोठ्या संगीताच्या तालावर पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा केला जात आहे.
Easter Sunday
Easter SundayDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापशातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झारखंडच्या काही युवकांनी इस्टरच्या नावाखाली कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठ्याने संगीत लावत मद्यपान, तंबाखू सेवन केल्याचा समोर आले आहे.

शेकडो युवक म्हापसा केटीसी बसस्थानकावर मद्यपान करताना निदर्शनास आले. याप्रकरणी सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे.

एका कॉलेजच्या परिसरात इस्टरच्या निमित्ताने मास आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, याबाबत चौकशी केली असता त्याठिकाणी कार्यक्रमाऐवजी मद्यपान, तंबाखू सेवन आणि मोठ्या संगीताच्या तालावर पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा केला जात आहे.

म्हापशातील केटीसी बसस्थानकावर शेकडो युवकांनी मद्यपान केल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

Easter Sunday
गोवा सरकारची मंगळवारी कठीण परीक्षा; भोम उड्डाणपुलाची जागा आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना दाखवणार

म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या परिसरातील वाईन शॉप्सना नोटीस बजावली असून, बसस्थानक परिसरातील मद्याच्या दुकानांना वैध कागदपत्रे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

याप्रकरणी माहिती गोळा करुन अबकारी खाते आणि अबकारी आयुक्तांना सादर केल्यानंतर पालिकेच्या मदतीने कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बार्देश तालुक्याच्या अबकारी अधिकाऱ्यांची नियमित गस्त सुरु असताना म्हापसा पालिका क्षेत्रात मद्याच्या दुकानांवर कारवाई केली. परवाना दर्शनी भागात न लावणे, स्टॉक व्यवस्थित न ठेवणे आणि सुट्टी दारु विक्री करणे याकारणास्तव अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com