Goa Recruitment 2021: गोवा लेखा संचालनालयात मेगा भरती; अर्जासाठी 31 मे अंतिम मुदत  

goa Recruitment.jpg
goa Recruitment.jpg
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली :  गोवा सरकारच्या लेखा संचालनालयात(Directorate of Accounts)  लेखाकारांच्या (Accountant)  पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी  अर्ज करण्यासाठी सात दिवस शिल्लक आहेत.  ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही  ते accountsgoa.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार लेखपालांच्या एकूण 109 रिक्त पदांवर भरती होणार आहे.  (Goa Recruitment 2021: Mega Recruitment in Goa Accounts Directorate; May 31 deadline for applications) 

  • अर्ज  करण्यापूर्वी अधिसूचना वाचा

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी लेखा विभागाने दिलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा. केवळ नियमांनुसार केलेला अर्ज वैध असेल. ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये त्रुटी किंवा कमतरता आढळून आल्यास तो अर्ज रद्द केला जाईल. 

  • शैक्षणिक पात्रता

या पदांवर अर्ज करणाऱ्या  उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य पदवी असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर बीए इकॉनॉमिक्स पदवीचे उमेदवारदेखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.

  • वयोमर्यादा 

या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 42  वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर नियमानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. 

  • महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 10 मे 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 31 मे 2021.
अधिकृत वेबसाइट - https://www.accountsgoa.gov.in/direct-recruitment/

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

BJP plans to increase women representation in Goa Assembly
Bank fraud of 75 lakh rupees in Goa
Goa Bicholim marigold flower cultivation
Farmers demand rejection of mining NOC in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com