गोव्यात आज सायंकाळपर्यंत ऑक्सीजन कॉन्सस्ट्रेटर होणार दाखल

Goa receiving 323 Oxygen Concentrators today
Goa receiving 323 Oxygen Concentrators today
Published on
Updated on

पणजी: गोव्यात(Goa) ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मंगळवारी 26 रूग्णांचा(Covid-19 patients) मृत्यू(Desath) झाला. त्यामुळे आता केंद्र सरकारने गोव्यासाठी ऑक्सीजन कॉन्सस्ट्रेटर(Oxygen Concentrators ) उपलब्ध केले आहेत. भारतीय हवाई दलाच्या(Indian Air Force) विमानाने आज सायंकाळपर्यंत ते गोव्यात दाखल होतील. असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आता सांगितले.(Goa receiving 323 Oxygen Concentrators today)

गोमेकॉ इस्पितळात दाखल असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी प्रतिदिन सुमारे 72 ऑक्सिजनच्या ट्रॉलींची गरज आहे. प्रत्येक 20  मिनिटाने एक ट्रॉली लावावी लागते व एका ट्रॉलीवर 48 ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर्स असतात अशी माहिती महसूल प्रधान सचिव गोएल यांनी सुनावणीवेळी दिली. इस्पितळाला दरदिवशी स्कूपकडून 1100 सिलिंडर्सचा पुरवठा होतो. इतर ऑक्सिजन पुरवठादारांकडून सुमारे 1900 सिलिंडर्सचा पुरवठा होता. त्यामुळे प्रतिदिन 72 ट्रॉलीचा (प्रत्येक ट्रॉलीवर 48 सिलिंडर्स) सिलिंडर्सचा पुरवठा अशक्य आहे.

अधिकाधिक 55 ट्रॉलीचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सचिव पुनित कुमार गोएल यांनी खंडपीठाला माहिती दिली. राज्याला प्रतिदिन 55 मे. टन ऑक्सिजनची गरज आहे. गोमेकॉ इस्पितळासाठी 20 मे. टन ऑक्सिजनची आवश्‍यकता आहे, त्यामुळे सरकारने केंद्राला 26 मे. टन ऐवजी 40 मे. टन ऑक्सिजन साठ्यात वाढ करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव रवी धवन यांनी खंडपीठाला दिली. 

सध्या गोमेकॉ इस्पितळात व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांना सुपरस्पेशिलिटी इस्पितळात स्थलांतर शक्य आहे, असा प्रश्‍न खंडपीठाने केला असता इस्पितळातील कोविड नोडल अधिकारी डॉ. विराज खांडेपारकर यांनी सांगितले, ते कठीण आहे. स्थलांतर करताना काहींचा मृत्यू संभवू शकतो. स्थलांतर करून ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात कमी फरक होऊ शकतो. मध्यरात्रीच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांचा ऑक्सिजन तुटवड्यामुळे मृत्यू होऊ नये, यासाठी काय करता येईल? असा प्रश्‍न खंडपीठाने सरकारला केला.

ऑक्सिजनअभावी मृत्यू होऊ नयेत, यासाठी सरकारने त्वरित पावले उचलण्यास सांगितले. कोरोनाग्रस्त रुग्णांना वाचविण्यासाठी व तोडगा काढण्यासाठी सरकारी यंत्रणा तसेच इस्पितळातील डॉक्टर्स व इतर कर्मचारी वर्ग जे प्रयत्न करत आहेत, ते वाखणण्याजोगे आहे. मात्र आणखी मृत्यू होऊ नये, यासाठी गोमेकॉ इस्पितळाला पुरेसा ऑक्सिजन साठ्याचा पुरवठा वेळेवेर होईल, यासाठी राज्य प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निरीक्षण खंडपीठाने केले.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com