Goa News: गोव्याला मिळाला 'ग्लोबल पिस अॅवॉर्ड'

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले.
ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले स्वामी
ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले स्वामीDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोव्याला ग्लोबल पिस अवार्ड मिळाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या गोव्यात सर्व धर्माचे लोक एकत्रित राहून आपली संस्कृती सांभाळतात. आज जे आमचे कार्य चालले आहे ते विदेशात मान्य करतात. त्यासाठी संस्थेने गोव्याला पीस अॅवॉर्ड दिला आहे. देवावर जर आपण विश्वास ठेवला तर सगळे लोक आम्हाला बरोबरचे वाटतात.

(Goa received Global Peace Award)

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले स्वामी
Goa Petrol Price: या राज्यांमध्ये आज पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, जाणून घ्या गोव्यातील स्थिती...
ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी
ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीDainik Gomantak

देवावर विश्वास ठेवून शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असा संदेश ब्रहमेशानंद स्वामींनी दिला. ग्लोबल पीस अॅवॉर्ड प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

त्यांचे आमदार व शिष्य-अनुयायींद्वारे जल्लोषात स्वागत. दि. 21 सप्टेंबर रोजी विश्व शांती दिना निमित्ताने जातीयवाद थांबवा आणि शांतता स्थापित करा या घोषवाक्याखाली काउंसिल फॉर युनिव्हर्सल पीस या संस्थेद्वारे ग्लोबल पीस समिट 2022 चे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटर, दुबई येथे करण्यात आले होते.

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले स्वामी
Goa News: वाहतूक संचालनालय गोवा सरकारतर्फे वास्कोत 'रस्ता सुरक्षा सप्ताह' साजरा
ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी
ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीDainik Gomantak

या समिटमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर शांती, एकता व मानवतेसाठी केलेल्या क्रांतिकारक दिव्य कार्याची दखल घेऊन सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींना ग्लोबल पीस अॅवॉर्ड दुबईचे शेख उबील अल मक्तूम ह्यांच्या हस्ते बहाल करुन गौरवान्वित करण्यात आले होते. आज दि. 12 ऑक्टोबर रोजी पूज्य स्वामीजींचे गोवा दाबोळी विमानतळावर आगमन झाले. दरम्यान मोठ्यासंख्येने शिष्य-अनुयायी स्वागतासाठी उपस्थित होते. याप्रसंगी मडगांवचे आमदार दिगंबर कामत, वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर, मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर, इंटरनॅशनल सद्गुरु फाउंडेशन सचिवा अॅड्. ब्राह्मीदेवीजी, तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठाचे संचालक मंडळ, प्रबंधक व कृपाकांक्षी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com