Goa Christmas 2023: गोव्यात नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी झाली असून अवघ्या काही तासात विविध चर्च मधून क्राइस्ट्स मास अर्थात येशुच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना म्हटली जाऊन नाताळ सण साजरा करण्यात येणार आहे.
सर्वत्र नाताळाची लगबग सुरू झाली असून विद्युत रोषणाईच्या माळा, ख्रिसमस ट्री, सांताचे मुखवटे, स्नोबॉल, टोप्या, गोठे आणि रंगीबेरंगी चांदण्या यांनी चर्च आणि ख्रिस्ती बांधवांची घरं फुलून गेलेली पाहायला मिळत आहेत.
नाताळ सणासाठी लागणाऱ्या (नेवऱ्या) करंज्या, गोडपदार्थ बनविण्याच्या तयारीसाठी लागणारे साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झले असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सजावट साहित्याच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
म्हापसा, पर्वरी, पणजी, ओल्ड गोवा, वास्को सारख्या शहरी भागात या उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.
तरूणाईने गोठा सजावटीच्या कामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारीत भव्य देखावे उभारण्याचे काम पूर्णत्वाला गेल्याचे दिसतंय.
तसेच कपेल, क्रॉसची रंगरंगोटी करण्यात आली असून तिथेही मोकळ्या जागेत मोठ्या कल्पकतेने गोठे उभारले गेले आहेत. विशेष प्रकारची पुडिंग, केक, चॉकलेट्स, फळे अशा सर्व खाद्य पदार्थांची रेलचेल पुढील काही दिवसांत गोमंतकीयांना अनुभवता येणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.