Goa: आरोग्‍यसेवेत गोवा देशात अव्‍वल! ‘सीएसई’चा अहवाल; पायाभूत सुविधांतही सर्वोच्च स्थान

Goa Health Ranking: गोव्‍यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला असता अन्‍य राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्याची नोंदणी व्यवस्था अधिक सक्षम असल्याचे स्पष्ट होते.
Goa health index 2025
Goa ranks top in health and infrastructureDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आरोग्य आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशातील सर्व राज्यांना मागे टाकत गोव्‍याने सर्वोच्च स्थान पटकावले आहे.

‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने (सीएसई) याबाबत अहवाल जारी केला आहे. गोवा हे असे एकमेव राज्य ठरले आहे, जिथे सर्व नोंदणीकृत मृत्यूंचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध आहे आणि मृत्यूचे नेमके कारण नोंदविले गेले आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकतेचे आणि जागरूकतेचे चांगले लक्षण मानले जात आहे.

पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ आणि ‘डाऊन टू अर्थ’ मासिकाने भारतातील पर्यावरण व विकासावरील संख्यात्मक विश्‍‍लेषणासह ‘स्टेट ऑफ इंडियाज्‌ एन्व्हायर्नमेंट इन फिगर्स : २०२५’ ही वार्षिक अहवाल मालिका प्रसिद्ध केली. त्‍यातून देशातील पर्यावरणविषयक स्थितीची चिंताजनक रूपरेषा समोर आली आहे. एकाही राज्याने सर्वच क्षेत्रांमध्ये समाधानकारक कामगिरी साधलेली नाही.

गोव्‍यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला असता अन्‍य राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्याची नोंदणी व्यवस्था अधिक सक्षम असल्याचे स्पष्ट होते. परंतु वीज, रुग्णसेवा आणि महिला रोजगारामध्ये आवश्यक ती गुंतवणूक आणि धोरणात्मक सुधारणा होणे गरजेचे आहे. अहवालात यंदा ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे १२ उपविभागांतील ४८ निदर्शकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले.

Goa health index 2025
Goa Politics: गोवा मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्‍यता, दिल्लीत पार पडली बैठक; CM सावंतांना वगळता सर्व मंत्र्यांचे घेणार राजीनामे

यामध्ये पर्यावरण, शेती, सार्वजनिक आरोग्य आणि मानवविकास हे मुख्य चार विषय आहेत. गोव्याचे नाव दोन प्रमुख विषयांमध्ये देशात सर्वोच्च स्थानावर झळकल्याने राज्यातील पर्यावरण-जागरूकतेच्या दृष्टिकोनातून हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

Goa health index 2025
Goa School: 'त्या' अभियंत्यांची आता खैर नाही! शाळांमधील दुरुस्तीच्या कामातील दिरंगाईवर मुख्यमंत्र्यांचा संताप, आलेमाव यांचा सरकारवर हल्लाबोल

संपूर्ण देशातील आकडेवारीचा आढावा घेतला असता, लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक भाग असलेल्या राज्यांमध्ये वातावरण, आरोग्य व विकासाच्या बाबतीत बिकट स्थिती आहे. त्यामुळे गोव्यासह इतर राज्यांनी आपले यश टिकवण्यासाठी व उर्वरित क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी संयुक्तपणे पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com