Power Cut Due to Rain: ‘अवकाळी’सोबत उद‌्भवली वीज खंडित होण्याची समस्‍या

Goa Rain Update : हवेत गारवा ः पुढील दोन दिवस वाऱ्यासह पाऊस शक्य
Goa Live News Update | IMD Rain News
Goa Live News Update | IMD Rain NewsDainik Gomantak

पणजी,दिवसभर असह्य होणारा उष्मा आणि सायंकाळी गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने राजधानी पणजीला अक्षरश: झोडपून काढले. त्‍यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.

हवामान विभागाने आणखी दोन दिवस राज्यात सोसाट्याच्‍या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज व्‍यक्‍त करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्‍यान, दोन दिवसांपासून अनेक भागांत वीजप्रवाह खंडित होण्‍यासोबत पाणीटंचाईच्‍या समस्‍येने डोके वर काढले आहे. रविवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे अटल सेतूवर पाणी साचले. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुलाच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या छिद्रांमध्ये कचरा अडकल्याने पाणी जाण्याचा मार्ग बंद झाले आणि पुलावर पाणी साचून राहिले.

पुलाच्या उतरणीच्या बाजूने साचलेल्या पाण्याच्या प्रवाहाला मार्ग मिळाल्याचे दिसून आले. तर मेरशी जंक्शनकडे महामार्गावर पाणी साचण्याचा प्रकार घडला.

१ अवकाळी पावसामुळे शनिवारी उत्तररात्री पणजी शहरात बराच काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.

२ पर्वरी, वाळपई, फोंडा, पेडणे तालुक्‍यातील अनेक भागांतही विजेचा लपंडाव सुरू आहे.

३ हवेत आर्द्रता वाढल्‍याने अंगाची काहीली होते. त्‍यात वीज खंडित होण्‍याने पाणी समस्‍याही उद्भवत आहे.

Goa Live News Update | IMD Rain News
Santa Cruz VP Goa: ऑलिव्हेरा सरपंचपदी कायम;अविश्‍वास ठराव बारगळला

नैॡत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) अंदमान दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने रविवारी दिली. या वर्षी उन्हाचा चटका वाढला असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे.

मॉन्सून रविवारी (ता. १९) अंदमानच्या दक्षिण भागात हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी दिला होता. त्यानुसार आता मॉन्सूनने तेथे वर्दी दिल्याचे खात्याने रविवारी जाहीर केले.

गोव्यात सहा जूनला वर्दी

अंदमानमध्ये पहिली सलामी दिल्यानंतर मॉन्सून पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये केरळमध्ये हजेरी लावतो. मॉन्सून सामान्यतः एक जूनला केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर उत्तरेकडे प्रवास करत कर्नाटक, गोव्यानंतर तळकोकणात वर्दी देतो. त्यामुळे सहा जून मॉन्सून गोव्यात दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com