Agonda News : आगोंद, खोला भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप

Agonda News : मात्र, शुक्रवार, ७ रोजीपासून आतापर्यंत दोन-दोन‌ मिनिटांत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे आगोंद व खोला भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवस पाऊस व हे हाल तर पुढे काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
Agonda
Agonda Dainik Gomantak
Published on
Updated on

Agonda News :

आगोंद, अवघ्या २४ तास झालेल्या मान्सून पावसामुळे आगोंद व आसपासच्या भागात नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. काहींच्या विहिरी भरल्या. गटारांचा उपसा करण्यात आला नसल्यामुळे रस्ते जलमय झाले आहे. जवळपास ७ इंच पावसाची नोंद झाली, अशी माहिती मिळाली आहे.

मात्र, शुक्रवार, ७ रोजीपासून आतापर्यंत दोन-दोन‌ मिनिटांत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे आगोंद व खोला भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवस पाऊस व हे हाल तर पुढे काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

परत परत वीज गायब होत असल्यामुळे सर्वांचेच हाल होत आहेत. विशेषकरून महिला वर्गाला स्वयंपाक बनवणे व अन्य कामांकरता जास्तच कष्ट होत आहेत. घरांतील विद्युत उपकरणे खराब होण्याच्या घटना घडत आहेत. मे महिन्यात वीज‌पुरवठा बंद करून वीजवाहिन्या व अन्य तातडीची दुरुस्ती वीज खात्यातर्फे करण्यात आली होती, तर मग हे सर्व करून काय फायदा झाला, असे विचारण्यात येत आहे.

Agonda
Goa Todays Update News: नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ!

गटार न उपसल्याने पाणी रस्त्यावर

शनिवार, ८ रोजी झालेल्या पावसामुळे आगोंद, काराशीरमळ येथील फर्नांडिस नामक व्यक्तीच्या घराभोवती असलेल्या चिरेबंदी भिंतीचा ५ ते ६ मीटर भाग कोसळून नुकसान झाले. तर बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यापूर्वी गटार उपसा न केल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहते आहे. काही ठिकाणी स्थानिक हातात फावडे घेऊन पाण्याला वाट करून देताना दिसून येत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com