Monsoon Health Care: आला पावसाळा, काळजी घ्या, आरोग्य सांभाळा! मलेरिया डेंग्यूबाबत जागृती आवश्‍यक

Monsoon Health Care: या रोगांवर कशाप्रकारे नियंत्रण आणावे, तसेच कोणती उपाययोजना करावी, यासंबंधी पावसाळ्यापूर्वी आढावा घेण्यासंबंधीची बैठक येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
Goa Rain
Goa RainDainik Gomantak

Monsoon Health Care

वाळपई, पावसाळा सुरू झाला की अनेक आजार तोंड वर काढतात. त्यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया असे आजार मोठ्या प्रमाणात आढळतात.

या रोगांवर कशाप्रकारे नियंत्रण आणावे, तसेच कोणती उपाययोजना करावी, यासंबंधी पावसाळ्यापूर्वी आढावा घेण्यासंबंधीची बैठक येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

यावेळी मामलेदार राजेश साखळकर, वाळपई आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. विकास नाईक, गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे, भिरोंडाचे सरपंच उदयसिंग राणे, खोतोडा सरपंच रोहिदास गावकर तसेच विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी, पंच, सरपंच, नागरिक उपस्थित होते.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी जास्त करुन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी, कुळागरे, गायती आदी ठिकाणी डेंग्युची पैदास होऊ शकते, मुळे पंचायत जनजागृती बरोबर उपाययोजना आखल्या पाहिजे, असे डॉ. विकास नाईक यांनी सांगितले.

यावेळी मामलेदार राजेश साखळकर यांनी पावसाळ्यापुर्वी तसेच पावसाळ्या सुरु झाल्यानंतर संबंधीत खात्याने गावागावत जाऊन परिसराची पाहणी करावी, असे सांगितले. भिरोंडा सरपंच यांनी जलसिंचन खात्याचे बागायतीत असलेले पाण्याचे चेंबर यावर पावसाळ्यात कोणती उपाय योजना करावी संबंधी आपल्या शंकाचे निवारण केले. त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी आपले विचार मांडले.

Goa Rain
Goa Murder Case: पर्यटनाला वास्‍कोत आले, चोरीसाठी वृद्धेला ठार केले; 26 दिवसांनंतर आंध्रातील दोघांना अटक

...मृत्यू ओढवू शकतो !

यावेळी डॉ. विकास नाईक म्हणाले की, डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित होतो. हा एक तीव्र फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो.

या रोगाचे डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ) असे दोन प्रकार आहेत. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com