Goa Rain : कुटुंब झोपेत असताना घरावर पडले झाड; प्राणहानी टळली

Goa Rain Update : रिवण येथील घटना : पारोडा पुलावर पाणी
home
home Dainik Gomantak
Published on
Updated on

केपे, वादळी वाऱ्यापावसामुळे केपे भागात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. घाटीवाडा-रिवण येथे जयंत प्रभुदेसाई यांच्या घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले. दुसरीकडे पारोडा येथे मुख्य रस्त्यावर व पुलावर पाणी आले. त्‍यामुळे वाहतुकीत व्‍यत्‍यय आला.

राज्यात परत एकदा पावसाने जोर धरला आहे. आज सकाळी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे घाटीवाडा-रिवण येथील जयंत प्रभुदेसाई यांच्या घरावर कोकमचे भले मोठे झाड पडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यावेळी घरावर झाड पडले, त्यावेळी प्रभुदेसाई, त्‍यांची पत्नी व दोन मुले एका खोलीत झोपली होती.

पण सुदैवाने त्‍या खोलीवर झाड पडले नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच रिवण तलाठ्याने पंचनामा करून अहवाल केपे मामलेदारांना पाठवला आहे.

home
G20 Summit In Delhi: अभिमानास्पद! गोव्याच्या रोडमॅपची G-20 परिषदेत चर्चा, काय म्हणाले पर्यटन सचिव... वाचा

केपे-मडगाव रस्‍त्‍यावरील वाहतूक खोळंबली

संध्याकाळी काराळी-केपे येथे केपे ते मडगाव रस्त्यावर या मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने काही वेळ या वाहतूक खोळंबून पडली. सदर झाड बाजूला करून नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

कुशावती नदीला परत एकदा पूर आल्याने पारोडा येथे मुख्य रस्त्यावर काही प्रमाणात पाणी आले. तसेच पारोडा पुलावरही पाणी आले होते. आज रात्रीपर्यंत पाऊस असाच सुरू राहिल्यास केपे ते मडगाव रस्ता व परोडा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली जाण्‍याची भीती व्‍यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com