Directorate of Transport: सार्वजनिक वाहनांमध्ये ट्रॅकिंग उपकरणे, आपत्कालीन सिग्नल बसवणे बंधनकारक; वाहतूक विभागाकडून ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत

Safety Technology Devices: 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सार्वजनिक वाहनांमध्ये ट्रॅकिंग उपकरणे आणि आपत्कालीन बटणे सुसज्ज करणे आवश्यक
Safety Technology Devices:  30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सार्वजनिक वाहनांमध्ये ट्रॅकिंग उपकरणे आणि आपत्कालीन बटणे सुसज्ज करणे आवश्यक
VAHAN, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Department Of Transport, Government of Goa

गोवा परिवहन संचालनाने मंगळवारी (दि. 8 ऑक्टोबर) रोजी राज्यातील सर्व सार्वजनिक वाहन चालकांसाठी आणि लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निर्देश जारी केले आहेत. नवीन आदेशानुसार 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांना सार्वजनिक वाहनांमध्ये ट्रॅकिंग उपकरणे आणि आपत्कालीन बटणे सुसज्ज करणे आवश्यक असणार आहे.

संचालनाने केलेल्या तपासणीनुसार अनेक सार्वजनिक वाहनांमध्ये ट्रॅकिंग उपकरणे आणि आपत्कालीन सिग्नल बसवली गेली नसल्याचे किंवा त्यांचा वापर केला जात नसल्याचे आढळून आले. यानंतर सार्वजनिक वाहन चालकांकडून ही सेफ्टी उपकरणे बसवण्यासाठी मागितलेल्या अवधीचा विचार करून हा नवीन निर्णय जारी करण्यात आला.

Safety Technology Devices:  30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सार्वजनिक वाहनांमध्ये ट्रॅकिंग उपकरणे आणि आपत्कालीन बटणे सुसज्ज करणे आवश्यक
Usgao Accident: दुर्दैवी! अपघातानंतर दुचाकीस्वार हवेत उडाला, उसगावात तरुणाचा मृत्यू

AIS-140 मानकांचे पालन करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याकडून ट्रॅकिंग डिव्हाइस आणि आपत्कालीन बटणांची खरेदी केली जाऊ शकते. विभागाने व्हीएलटी उपकरण निर्माते, ओईएम डीलर, ऑथोरिझ डीलर यांना सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये ही उपकरणे बसवण्याचे आदेश दिले आहेत आणि यानंतर VAHAN पोर्टवर जाऊन वाहनाच्या क्रमांकासह सर्व तपशील जोडायचे आहेत.

राज्यातील सर्व सार्वजनिक वाहनांनी या नवीन आदेशाचे पालन करणे अनिवार्य आहे आणि वाहनाच्या फिटनेस टेस्टच्या वेळी विभागाकडून याची तपासणी केली जाईल अशीही माहिती गोवा परिवहन संचालनाने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com