Goa: आंदोलनकर्त्या पॅरा शिक्षकांना अटक

विधानसभेवर मोर्चाचा प्रयत्न (Goa)
Para Teachers Protest at Azad Maidan, Panjim, Goa
Para Teachers Protest at Azad Maidan, Panjim, GoaSandip Desai / Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आपणास कायम सेवेत (Permanent Service) घ्यावे या मागणीसाठी विधानसभेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या पॅरा शिक्षकांना (Para Teachers) आज पणजी पोलिसांनी (Panaji Police)अटक केली. यात काही गरोदर शिक्षिकांचाही समावेश होता. पॅरा शिक्षक विधानसभेवर मोर्चा काढण्यासाठी आज आझाद मैदानावर जमले होते (Azad Maidan). शहरात मोर्चा काढण्याची परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी या शिक्षकांना आझाद मैदानावरच रोखले. मात्र, पोलिसांच्या विरोधानंतरही शिक्षकांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी सर्व पॅरा शिक्षकांना अटक केली व वाहनातून आगशी पोलिस स्थानकात नेले. गेली १५ वर्षे कंत्राटी पध्दतीने विविध सरकारी शाळांत शिकवणाऱ्या या १२९ शिक्षकांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. २००६ साली कॉंग्रेस काळात या सर्वांना कंत्राटी पध्दतीवर शिक्षण सेविका तथा ‘रेमेडियर टिचर’ या पदावर घेण्यात आले होते. कॉंग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे सरकार आले, तरी त्यांना सेवेत कायम केले नाही. भाजप सरकारने त्यांचे वेतन ५ हजारावरून ३४ हजार केले. (Goa)

Para Teachers Protest at Azad Maidan, Panjim, Goa
Tarun Tejpal Case: लैंगिक अत्याचार प्रकरणावरील सुनावणी तहकूब

आपणास सेवेत कायम करावे या मागणीसाठी गेली अनेक वर्षे या शिक्षिका संघर्ष करत आहेत. सध्या गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. उद्या ते संपणार आहे. त्यामुळे सरकारवर दबाव टाकण्यासाठी पॅरा शिक्षकांनी आज विधानसभेवर मोर्चा नेण्याचे ठरवले होते. पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक तसेच इतर अधिकाऱ्यांनी मोर्चाची परवानगी नसल्याचे कारण सांगून पॅरा शिक्षकांना आझाद मैदानावरच अडवून ठेवले व जर आझाद मैदानाच्या बाहेर जबरदस्तीने मोर्चा काढला, तर कायद्यानुसार अटक करावी लागेल. असेही पोलिसांनी पॅरा शिक्षकांना बजावले. त्यासाठी मोठा पोलिस फौजफाटाही आणण्यात आला होता. पोलिसांना न जुमानता पॅरा शिक्षकांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना अटक करून वाहनांतून आगशी पोलिस स्थानकात नेण्यात आले. दरम्यान, आगशी येथे पॅरा शिक्षकांनी घरी जाण्यास नकार दिल्यामुळे बराच संघर्ष निर्माण झाल्याचे वृत्त रात्री पसरले होते. आपणाला पोलिसांनी सोडले तरी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे पॅरा शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष स्मिता देसाई यांनी रात्री सांगितले.

Para Teachers Protest at Azad Maidan, Panjim, Goa
Goa Assembly Session: अटल सेतूवरील खड्ड्यांचा अभ्यास चेन्नई आयआयटी करणार

शक्य असेल त्यांना सेवेत घेणार : मुख्यमंत्री

पॅरा शिक्षकच नव्हे, तर इतर विविध खात्यांत १२ ते १५ हजार शिक्षक व इतर कर्मचारी कंत्राटी पध्दतीवर आहेत. त्या सर्वांना सध्या सेवेत घेणे शक्य नाही. मात्र, शक्य आहे व गरज वाटेल तेव्हा काहींना सेवेत टप्प्याटप्याने घेतले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आपण अनेकांचे वेतन १२ हजार होते ते २५ हजार केले आहे. पॅरा शिक्षकांनाही दरवर्षी वेतन वाढ मिळेल. तसेच दहा महिने काम व बारा महिन्यांचा पगार दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com