Goa : गोव्याच्या किनारी भागात रुजताहेत वेश्या व्यवसायाची पाळंमुळं

गोव्यात हरमलच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय सुरु असून यामध्ये बंगाली, नायजेरियन, बिगर गोमंतकीय युवती तसंच महिलांचा समावेश आहे.
Prostitution in Goa
Prostitution in GoaDainik Gomantak

Goa : गोव्यात हरमलच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय सुरु असून यामध्ये बंगाली, नायजेरियन, बिगर गोमंतकीय युवती तसंच महिलांचा समावेश आहे. रात्री आठ ते पहाटे चार पर्यंत मोठ्या प्रमाणावर हा वेश्याव्यवसाय किनारी भागात चालतो, असं काहीसं चित्र गोव्यात सध्या निर्माण झालं आहे.

पर्यटन हंगाम सुरु होताच गोव्यात किनारी भागात संगीत रजनी, पार्ट्या, चोरी, हाणामारी असे प्रकार सुरु झाले आहेत. यासोबतच आता खुलेआम हरमलच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीय युवती आणि महिलांकडून वेश्या व्यवसाय सुरु असल्याचं भयानक वास्तव उघड झालं आहे. रात्री आठ वाजल्यानंतर सुरू झालेला हा वेश्याव्यवसाय पहाटे चारपर्यंत चालतो. यात मोठ्या प्रमाणात नायजेरियन, बंगाली, तसंच नेपाळी युवती, महिलांचा समावेश आहे. शिवाय तृतीयपंथींचाही यात समावेश आहे.

Prostitution in Goa
Goa Panchayat Election : चांदेल सरपंचपदी तुळशीदास गावस यांची बिनविरोध निवड?

किनारी भागात सुरु असलेल्या या वेश्याव्यवसायाचा कारभार दलालांच्या माध्यमातून चालवला जातो. दलाल ग्राहक मिळवून वेश्याव्यवसायातील मुलींना महिलांना पाठवत असतो. पाचशे रुपयांपासून सुरू झालेला व्यवहार तब्बल 15000 हजार पर्यंत चालतो. काही बंगाली महिला 3000 आणि पाचशे रुपये रूमचे भाडे मिळून साडेतीन हजार, नायजेरियन दोन हजार रुपये आणि पाचशे रुपये भाडे आकारतात. जर एखाद्या महिलेला पूर्ण रात्रीसाठी न्यायचं असेल तर नायजेरियन 8 ते 12 हजार रुपये, बंगाली युवती 15 ते 22 हजार रुपये असा दर आकारतात.

हरमलच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात महिला, युवती रात्री अपरात्री जमलेल्या असतात. दरम्यान पोलिसांनाही याची माहिती असून त्यांच्याकडून या सर्व प्रकाराकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com