मोरजी: धारगळवासीयांनी पर्यायाने पेडणे (Pernem) मतदार संघातील मतदारांनी आणि जनतेने आपल्याला उच्च स्थान प्राप्त करून दिले ,त्यांच्या ऋणात आपण सदैव असणार आहे ,धारगळ पंचायत क्षेत्राच्या विकासाठी आपण सदैव प्रयत्नशील असणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी धारगळ सरपंचपदी (Sarpancha) भूषण उर्फ प्रदीप नाईक यांची निवड झाल्यानंतर भेट घेऊन दिली.यावेळी उपसरपंच आराधना नाईक, पंच प्रदीप पटेकर, पंच अर्जुन कानोळकर, माजी सरपंच सुनीता राऊळ, पंच वल्लभ वराडकर, सोनाली साळगावकर व सुभाष धारगळकर आदी उपस्थित होते.
भूषण नाईक यांची दुसऱ्यांदा सरपंच म्हणून निवड झाली आहे. बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पंचायत मंडळाने अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना धारगळ पंचायतीचा विकास पंचायतीला हवा तसा करून घ्यावा असे आवाहन करून धारगळ पंचायत क्षेत्रात होवू घातलेल्या बहुउद्देशीय प्रकल्पामुळे वर्षाकाठी करोडो रुपये पंचायतीला महसूल मिळणार आहे, असे सांगून आयुष हॉस्पिटल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान रवींद्र भवन असे प्रकल्प याच पंचायत क्षेत्रात होवू घातले आहेत. त्या प्रकल्पातून निर्मिती होणारे रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
नवनिर्वाचित सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक यांनी प्रतिक्रिया देताना ज्या आपल्या सहकाऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून सरपंच पद दिले. त्या विश्वासाला आपण पात्र ठरवून दाखवणार, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि सरकारच्या माध्यमातून विकास करण्यावर आपण भर देणार असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.