Goa Power Tariff Hike: 'प्रलंबित थकबाकी वसूल करा', जनतेची मागणी तर JERC म्हणते वीज दरवाढ योग्यच...

Goa Power Tariff Hike: पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात सकाळी 10 वाजता जनसुनावणी घेतली
Goa Power Tariff Hike
Goa Power Tariff HikeDainik Gomantak

Goa Power Tariff Hike: गोवेकरांना नववर्षात वीजदरवाढीचा शॉक बसणार असून गोवा सरकारच्या 7-13% वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आज म्हणजेच सोमवारी पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात सकाळी 10 वाजता जनसुनावणी घेतली असून यात दरवाढ योग्यच असल्याचे मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नाडिस यांनी सांगितले.

2022-23 सालाच्या टू-अप, 2023-24 चा वार्षिक कार्यप्रदर्शन पुनरावलोकन, 2024-25 साठी वार्षिक महसूल आवश्यकता आणि विद्युत विभागाच्या 2024-25 साठी शुल्क प्रस्ताव 2021 च्या तरतुदींनुसार ही जनसुनावणी पार पाडली.

जेईआरसीच्या या जनसुनावणीत उपस्थित लोकांनी वीज दरवाढीला कडाडून विरोध केला. मंडळाला होणाऱ्या तोट्याला आळा घालण्यासाठी जर दरवाढ केली जात असेल तर ही गोष्ट समर्थनीय नाही.

यावर उपाय म्हणून वीज विभागाने जी प्रलंबित थकबाकी वसूल असेल ती पूर्णतः वसूल करावी आणि महसूल गळती दूर करावी असा युक्तिवाद यावेळी जेईआरसी जनसुनावणीत वीज दरवाढीला विरोध.

तोट्याला आळा घालण्यासाठी दरवाढ समर्थनीय नाही. वीज विभागाने प्रलंबित थकबाकी वसूल करावी आणि महसूल गळती दूर करावी, असा लोकांचा युक्तिवाद मांडला. मात्र मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नाडिस यांनी वीज दरात 6 टक्के वाढ योग्यच असल्याचे सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com