Porvorim Flyover: पर्वरीत पर्यायी रस्त्यांची दुरावस्था! उड्डाणपूल कामावेळी निष्काळजीपणा; हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त

Porvorim Guirim Roadwork Updates: पर्वरी ते गिरीदरम्यान सध्या सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे पर्यायी रस्त्यांच्या डांबरीकरणासंदर्भात वारंवार निर्देश देऊनही वेळेत त्या कामांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते.
Porvorim Flyover: पर्वरीत पर्यायी रस्त्यांची दुरावस्थाच! उड्डाणपूल कामातही निष्काळजीपणा; हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त
Porvorim Guirim Roadwork UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्वरी ते गिरीदरम्यान सध्या सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे पर्यायी रस्त्यांच्या डांबरीकरणासंदर्भात वारंवार निर्देश देऊनही वेळेत त्या कामांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. तसेच अजूनही अनेक ठिकाणी डांबरीकरण झाले नसल्याची छायाचित्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. या छायाचित्रांची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या कामाची त्वरित चौकशी करून त्याचा अहवाल १७ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले. संंबंधित कंत्राटदाराने येत्या मंगळवारपर्यंत (२१ जानेवारी) या कामांबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण द्यावे, असाही आदेश दिला आहे.

Porvorim Flyover: पर्वरीत पर्यायी रस्त्यांची दुरावस्थाच! उड्डाणपूल कामातही निष्काळजीपणा; हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त
Porvorim Flyover: 88 पैकी 40 खांबांचे काम पूर्ण! पर्वरी उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर

मोसेस पिंटो यांच्या जनहित याचिकेत हस्तक्षेप अर्जदार असलेल्या युरिको मास्कारेन्हस या पर्वरीतील रहिवाशातर्फे ॲड. अभिजीत गोसावी यांनी आज रस्त्यांच्या दुर्दशेबाबतची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र छायाचित्रांसह खंडपीठात सादर केले. ही छायाचित्रे पाहून खंडपीठाने संताप व्यक्त केला. डांबरीकरणाचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पर्यायी रस्त्यांच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे आश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता केली जात नसल्याबाबत जाब विचारला. गोवा खंडपीठ निर्देश देते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आताच्या आता या कामाची तपासणी करण्यास पाठवून त्याचा अहवाल उद्यापर्यंत द्या, असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांना सांगितले.

Porvorim Flyover: पर्वरीत पर्यायी रस्त्यांची दुरावस्थाच! उड्डाणपूल कामातही निष्काळजीपणा; हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त
Porvorim Flyover: गोमंतकीयांनो पर्वरी उड्डाणपूलाबाबत समस्या आता WhatsApp वर पाठवा! लवकरच सुरु होतेय सेवा

छायाचित्रांमधून मांडली व्यथा

पर्वरीतील (Porvorim) या कामामुळे ज्या पर्यायी रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे निर्देश दिले होते, त्याची अंमलबजावणी झाली नसल्याची छायाचित्रे देण्यात आली. त्यामध्ये ओरियन हॉटेलसमोरील आरजी इस्पितळाकडील रस्ता, ओ कोकेरो जंक्शन, टोयोटा शोरूम, वेलनेस फार्मसी, ह्युंडाई शोरूमसमोरील रस्ता, दामियन दी गोवा समोरील रस्ता, आरा सुकूर जंक्शन, गॅलेक्सी रेसिडेन्सी, नेक्सा शोरूम, क्रोमा शोरूम, फर्स्ट क्राय शोरूम, गिरी - पर्रा महामार्ग सर्व्हिस रस्ता यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com