Sanjay School Accident: सिडनीच्या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार कोण? पालकांत संताप

इमारतीवरून पडून जखमी; गोमेकॉत सोडला जीव
Sanjay School Disabled Student Death in Goa
Sanjay School Disabled Student Death in GoaDainik Gomantak

Sanjay School Disabled Student Death in Goa काही दिवसांपूर्वी पर्वरी येथील राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या सिडनी डिसोझा (वय 41, हळदोणे) या दिव्यांग तरुणाचा आज गोमेकॉत मृत्यू झाला. आता त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ती इमारत सध्या दिव्यांगांसाठीच्या संजय स्कूलचे उच्च माध्यमिकचे वर्ग भरविण्यासाठी आहे. या प्रकरणी पोलिसात अपघात आता सिडनीच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

या प्रकरणी गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी ती इमारत जीर्णावस्थेत व धोकादायक असल्याने तेथील दिव्यांग विद्यार्थ्यांचे वर्ग तसेच कर्मचारी वर्गाला स्थलांतर करण्याचे निर्देश दिले होते, परंतु आयुक्तांच्या त्या सूचनेकडे दुर्लक्ष झाल्याने या दिव्यांग तरुणाला जिवाला मुकावे लागले आहे.

यामुळे त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या नातेवाइकांनी सरकार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. याविषयी अद्याप रीतसर तक्रार मात्र नोंद केलेली नाही.

Sanjay School Disabled Student Death in Goa
Coal Handling At Mormugao Port: नियंत्रण मंडळाचेच वाहतूकदारांना अभय, पोलिस तक्रारीचा निर्णय बरेच महिने प्रलंबित

गेल्या ३० ऑगस्टला या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आधार केंद्रामध्ये दिव्यांग तरुण आपल्या आईसोबत गेला होता. त्याची आई कागदपत्रे घेऊन आत कार्यालयात गेली, तेव्हा तो बाहेर व्हरांड्यात लोखंडी रेलिंग्सला टेकून उभा होता.

जीर्णावस्थेतील हे लोखंडी रेलिंग्स मोडले व त्याचा तोल जाऊन तो खाली पडला होता. त्याच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असताना तो बेशुद्धावस्थेतच होता. त्याच्या कंबरेपासूनचा काही भाग लुळा पडला होता.

त्याच्या पाठीच्या मणक्याचे हाड मोडले तसेच त्याच्या डोक्यालाही गंभीर जखमा झाल्याने टाके घालण्यात आले होते. गेल्या ३० ऑगस्टपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, काल त्याला मृत्यूने गाठले. सरकारने विद्यार्थ्याला भरपाई देण्याची मागणी गोवा डिसॅबिलिटी राइट्स असोसिएशनने (ड्रॅग) केली होती.

Sanjay School Disabled Student Death in Goa
Goa Petrol Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलचे भाव जैसे थे; जाणून घ्या आजचे ताजे दर

आपल्या परिवारातील एक प्रिय दिव्यांग सदस्य सिडनी रॉड्रिग्ज याचे एका अपघातानंतर दुःखद निधन झाले, याबाबत आम्ही शोक व्यक्त करत आहोत. सर्वांत असुरक्षित गटांमध्ये दिव्यांग व्यक्ती येतात.

भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक इमारतींचे सर्वसमावेशक बांधकाम, प्रवेशसुलभता आणि आपत्कालीन निर्गमन याविषयीचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

- गुरुप्रसाद पावसकर, गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त

Sanjay School Disabled Student Death in Goa
Coal Handling At Mormugao Port: नियंत्रण मंडळाचेच वाहतूकदारांना अभय, पोलिस तक्रारीचा निर्णय बरेच महिने प्रलंबित

चौकशी करण्याची मागणी

या दिव्यांग तरुणाच्या मृत्यूमुळे दिव्यांग मुलांच्या पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या ३० ऑगस्टपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, काल त्याला मृत्यूने कवटाळले. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून यासंदर्भात सरकारने चौकशी करून या घटनेला जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

सिडनी हा दिव्यांग मुलांमध्ये हुशार होता. सरकारच्या गलथानपणामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. सिडनीच्या जाण्यामुळे डिसोझा कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले. या कुटुंबीयांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी. - कॉस्मो अल्बर्ट, सिडनीचे मामा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com