Porvorim Accident काही दिवसांपूर्वी पर्वरीत महामार्गावर झालेल्या कारच्या भीषण अपघातात एका महिलेसह तिघेजण जागीच ठार झाले होते. तर दोघांवर गोमेकॉत उपचार सुरू होते. प्रथमदर्शनी कार चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात होते.
मात्र याच अपघातासंबंधी एक महत्वाची अपडेट हाती येतेय. कारचा वेग हा भरधाव होता. त्यामुळे कारचालकाला कारवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नसावे.
मात्र ड्रायव्हरने अल्कोहोल प्राशन केले की नाही हे अद्याप समजू शकले नाही, असे एसपी निधिन वलसन यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलय.
पत्रकार परिषदेत बोलताना ते असे म्हणाले कि, आम्ही सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले आहे. सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये कार खूप वेगाने जात असल्याचे आहे.
तसेच मिळालेल्या फुटेजच्या आधारे अशा शक्यता दिसताहेत कि एकतर कार चालवत असताना ड्रायव्हरला झोप लागली असेल. दुसरे कारण असे असू शकते की, तो खूप वेगाने जीपला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचे नियंत्रण सुटले असावे.
तसेच आम्हाला सुरुवातीच्या परीक्षेत अल्कोहोलचे कोणतेही प्रमाण दिसले नाही परंतु व्हिसेरा तपासणीनंतर तपशीलवार तपासणी केली जाईल. या प्रक्रियेला बराच वेळ लागेल. परंतु त्या अहवालाच्या आधारे ड्रायव्हर मद्यधुंद होता की नाही हे स्पष्ट होईल असे एसपींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टी भागात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. रात्री संगीत पार्ट्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात केले आहेत.
यावर्षी आतापर्यंत 980 मद्यधुंद चालकांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी याच काळात 795 मद्यपींविरुद्ध कारवाई झाली होती. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ही कारवाई अधिक कठोर केली जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.