Goa News: वैश्यगुरू सेवा समिती फोंडा तालुकातर्फे शनिवारी 19 व रविवारी 20 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्यगुरू वामनाश्रम महास्वामींच्या संकल्पाप्रमाणे काशी मठ पूननिर्माण तसेच बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने भव्य पदयात्रा सुरू करण्यात आली
असून ही पदयात्रा शनिवारी 19 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ढवळी चौपदरी सर्कलजवळ पोचल्यावर समिती व सदस्यांतर्फे स्वामीजींचे भव्य स्वागत करण्यात येईल, अशी माहिती वैश्यगुरु सेवा समिती फोंडा तालुका अध्यक्ष महादेव खानोलकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी समितीचे पदाधिकारी देवेंद्र ऊर्फ बाबू पारकर, शाणूदास सावंत व लक्ष्मीकांत शेट्ये आदी उपस्थित होते. वामनाश्रम स्वामींचे शनिवारी 19 रोजी ढवळी, तिस्क, सदर, वरचा बाजार ते भूमिपुरुष देवस्थानपर्यंत मिरवणुकीने आगमन होईल.
त्यानंतर देवतापूजन, मंत्राक्षता, व महाप्रसाद तसेच इतर कार्यक्रम होतील. रविवारी 20 रोजी सकाळी दहा वाजता स्वमीजींच्या हस्ते चंद्रमौळीश्वर पूजा होणार असून दुपारी महाप्रसाद होईल. रविवारी स्वामीजींचे सावईवेरे मार्गे माशेल येथे प्रस्थान होईल.
वामनाश्रम स्वामींचे शुक्रवारी आगमन
ज्ञाती बांधवांमध्ये एकोपा घडवून आणण्याचा श्री श्री वामनाश्रम स्वामींनी संकल्प सोडलेला असून त्या करिता स्वामीजींची पदयात्रा सुरू आहे. या पदयात्रेचे शुभ आगमन शुक्रवार 18 रोजी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास मडगाव येथे श्री विठ्ठल मंदिर कोंब येथे होणार आहे.
या समयी भाविकांनी व ज्ञाती बांधवांनी तिथे उपस्थित राहून श्रींच्या आरतीसह स्वामींच्या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.