Water Shortage: नाणूसवासीयांची पाण्यासाठी वणवण! संतप्त महिलांची फोंडा पाणीपुरवठा कार्यालयावर धडक

Water Shortage: उसगांव गावात टॅंकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन अभियंते यशवंत मापारी यांनी दिले.
Water Shortage
Water ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

Water Shortage: गेल्या महिन्यापासून उसगांव नाणूस येथील गावात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. वारंवार तक्रार करूनही पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी दाग फोंडा येथील संबंधित पाणीपुरवठा करणाऱ्या विभागावर धडक दिली.

यावेळी नाणूस गावात फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. तेव्हा फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त होईपर्यंत दररोज पाण्याचे दोन टँकर देण्याचे आश्वासन सहायक अभियंते यशवंत मापारी यांनी दिले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व उसगाव गांजे पंचायतीचे पंच सदस्य प्रकाश उर्फ संजय गावडे यांनी केले. यावेळी रोहिदास गावडे, रवींद्र गावडे, विस्मय मडकईकर तसेच महिलांही उपस्थित होत्या. गेल्या महिन्यापासून नाणूस गावात पाणीटंचाई समस्या आहे.

या भागात जलस्त्रोत खात्यामार्फत मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम चालू होते. त्यावेळी खोदकाम करताना जलवाहिन्या फुटलेल्या होत्या. अजून फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती न झाल्याने गावात पाणीटंचाई समस्या वाढत चाललेली आहे.

Water Shortage
Junk the Plastic Campaign: गोवा मिरामार येथे 'आकाश बायजूस'तर्फे किनारा स्वच्छता मोहिम

उसगांव भागात सुरळीत पाणीपुरवठा होतोय मग नाणूस भागातच पाणी का नाही अशी कैफियत महिलांनी यावेळी सहाय्यक अभियंते यशवंत मापारी यांच्यापुढे मांडली. संजय गावडे, रोहिदास गावडे यांनी चर्चा केली. दरम्यान, कनिष्ठ अभियंते महेश गावणेकर ग्रामस्थांना भेटले होते. परंतु ते तोडगा काढण्यात अपयशी ठरले.त्यामुळे संतप्त महिलांनी सहा.अभियंता यशवंत मापारी यांना घेराव घातला.

यशवंत मापारी, सहाय्यक अभियंता-

आम्ही शक्य तेवढ्या लवकर फुटलेली जलवाहिनी दुरूस्ती करणार आहे. घरातील वाहिन्याही बदलणार असून प्रत्येकाने आपली झेरॉक्स बिले सादर करावीत, तसेच या भागात मोठी टाकी बांधण्याचा प्रस्ताव असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com