World Toilet Day 2022 : मजुरांकडून उघड्यावर घाण; सार्वजनिक आरोग्य धोक्यात

World Toilet Day 2022: शौचालयांची मोठी समस्या
World Toilet Day 2022|Goa News
World Toilet Day 2022|Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

World Toilet Day 2022: राज्य सरकारने गोवा हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले असले तरी राज्याच्या बऱ्याच भागात अजूनही उघड्यावर शौचविधी केले जात असल्याने कोणता भाग हागणदारीमुक्त आहे, असा सवाल साहजीकच नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे भाडेपट्टीवर राहणाऱ्या मजुरांकडून उघड्यावर शौचविधी करण्याचे प्रकार घडत आहेत आणि फोंडा तालुकाही त्याला अपवाद नाही.

फोंडा व कुर्टी भागात उघड्यावर या भाडेकरूंकडून शौचविधी केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिका आणि पंचायतीने याप्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची आवश्‍यकता आहे.

सध्या भाडेपट्टीवर घरे देण्याचे प्रकार वाढलेत. विशेषतः कुर्टी, ढवळी भागात भाडेकरूंची संख्या वाढली आहे. मात्र, शौचालय सुविधा नाही.

कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रात तर नागझर भागात मुख्य बगल रस्त्याच्या बाजूलाच उघड्यावर मजूर लोकांकडून शौचविधी केला जातो. याशिवाय बांदोडा पंचायत क्षेत्रातील गांधी नगर तसेच शापूर भागातही नेमका हाच प्रकार आहे.

अजूनही अनेक वंचित

मागच्या काळात सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कमी पैशांत घरगुती शौचालय बांधण्याचे काम झाले. तरी अजूनही अनेक लाभार्थी या योजनेची वाट पाहात आहेत. मध्यंतरीच्या काळात या शौचालय सुविधेसाठी अनेकांनी अर्ज सादर केले, त्यांना वर्षभरानंतर ही cमिळाली.

आताही ही सुविधा उपलब्ध करताना प्रत्येक पंचायतीने उघड्यावर कुठे शौचविधी केला जातो, त्याचा शोध घ्यावा व त्यादृष्टीने शौचालय सुविधा उपलब्ध कराव्यात, असेही मत व्यक्त होत आहे.

World Toilet Day 2022|Goa News
World Toilet Day 2022: डिचोली तालुका हागणदारी मुक्तीच्या प्रतीक्षेत!

"भाडेकरूंना खोल्या दिल्या जातात. मात्र, त्यांना शौचालय उपलब्ध केले जात नाही, त्यामुळेच ही सगळीकडे घाण होत आहे. अशा घरांचे आणि खोल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना दंड आकारण्याची आज गरज आहे."

- विशांत नाईक, नागझर-कुर्टी

"केवळ पैशांसाठी परप्रांतीय मजुरांना खोल्या दिल्या जातात; पण या खोल्या देताना कोणतेच कायदेकानून मानले जात नाही. त्यामुळे उघड्यावर आंघोळ आणि शौचविधी केल्याशिवाय या मजुरांना पर्याय राहात नाही. सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेण्याची आवश्‍यकता आहे."

- सूरज गावकर, ढवळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com