Ponda News: फोंड्यात 'भारत स्वच्छता'अंतर्गत लोकसहभागातून मोहीम

गेल्या वर्षी याच दिवशी सेवा दिवस हा उपक्रम आयोजित केला होता
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak

Ponda News ज्याप्रमाणे आपले घर आहे, त्याचप्रमाणे आपले शहर आहे, ही भावना मनात ठेवा आणि फोंडा स्वच्छ राखण्यासाठी पालिकेला मदत करा, असे आवाहन फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी केले.

फोंड्यात आज भारत स्वच्छता मोहिमेंतर्गत फोंडा शहर परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. फोंडा पालिकेबरोबर हिलदारी आस्थापन तसेच इतर सेवा संघटनांनी सहभाग घेऊन ही स्वच्छता मोहीम यशस्वी केली. गेल्या वर्षी याच दिवशी सेवा दिवस हा उपक्रम आयोजित केला होता व तो यशस्वी करण्यात आला होता.

या स्वच्छता मोहिमेची सुरवात विविध उपक्रमांनी झाली. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी झेंडा दाखवून ‘रन’ला सुरवात केली, त्यानंतर फोंडा बसस्थानक तसेच इतर भागात स्वच्छता मोहीम सुरू झाली. फोंडा बसस्थानकावर स्वच्छतेसंबंधी जनजागृती करणारे पथनाट्यही सादर करण्यात आले.

नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यासोबत उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, पालिका मुख्याधिकारी शुभम नाईक, नगरसेवक आनंद नाईक, रूपक देसाई, शौनक बोरकर, ज्योती नाईक तसेच पालिकेचे अधिकारी, हिलदारी आस्थापनाचे कार्यकर्ते, पीईएस महाविद्यालयाचे विद्यार्थी, साळगावकर कायदा महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

‘फोंडा स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची’

प्रत्येकाने स्वच्छता राखण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. आपण ज्या परिसरात राहतो, तो परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. देशाच्या जडणघडणीत आपलाही काही सहभाग असावा ही भावना प्रत्येकाच्या मनात रूजली पाहिजे.

तसेच ती मूर्त रूपात येण्यासाठी अशाप्रकारच्या उपक्रमात सहभाग असणे गरजेचे आहे. फोंडा स्वच्छ व सुंदर ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदार असून त्यादृष्टीने प्रत्येकाने फोंडा पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन रितेश नाईक यांनी केले.

Ponda News
Goa Honey Trap Case: कळंगुट-कोलवाळ पोलिसांकडील हनी ट्रॅप प्रकरणाच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com