Marcel- Khandola Goa: 274 वर्षांचा इतिहास लाभलेला खांडोळ्याचा वैशिष्ट्यपूर्ण महागणपती

वर्षभर उत्सव : देश-विदेशातील भाविकांचे खास दैवत;
Khandola Mahaganpati
Khandola Mahaganpati Dainik Gomantak
Published on
Updated on

संजय घुग्रेटकर

देवभूमी म्हणून गणल्या जाणाऱ्या गोमंतक भूमीतील माशेल-खांडोळा या पुण्यक्षेत्राची महती विशेष आहे. या पंचक्रोशीत विविध देवदेवता अशा काही दाटीवाटीने निवासाला आहेत, की एखाद्याला वाटावे, इथे माणसांपेक्षा देवतांचे वास्तव्यच अधिक आहे. खांडोळ्यात श्री महागणपतीचे मंदिर प्रसिद्ध असून या मंदिराला 274 वर्षांचा इतिहास आहे, असे जाणकार सांगतात.

अनेक वेळा स्थलांतर, परकीय शक्तीशी संघर्ष करीत, जिद्दीने, निष्ठेने आणि भक्तिभावाने महागणपती मंदिर खांडोळ्यात उभारले असून येथे वर्षभर विविध उत्सव साजरे होतात. देश-विदेशातील भाविक वर्षभर नियमितपणे या महागणपती मंदिराला भेट देतात. अनेक पिढ्यांचे बाप्पाशी असलेले नाते भाविक जपतात. त्यामुळेच खांडोळ्याचा महागणपती देश-विदेशात प्रसिद्ध पावला आहे.

सध्याच्या काळात श्रीगणपती देवस्थान जे खांडोळा येथे आहे, ते देवस्थान प्राचीनकाळी दिवाडी बेटावरील नावेली या भागात होते. या देवालयाचे स्थलांतर नावेलीहून फोंडा तालुक्‍यात खांडेपार नंतर डिचोली तालुक्‍याच्या नार्वे या पुण्यक्षेत्रात आणि तेथून फोंडा तालुक्‍यातील खांडोळा गावात झाले.

खांडोळा गावातील या देवालयात प्रमुख दैवत गणपती आणि इतर देवालये आहेत. म्हणजे श्री शांतादुर्गा उजवीकडे वेगळ्या देवालयात, श्रीग्रामपुरुष, श्रीपूर्वाचारी, श्रीगणपतीच्या गर्भागरात, श्रीरवळनाथ, श्रीमहालक्ष्मी, श्रीलक्ष्मीनारायण, श्रीसूर्यनारायण वेगवेगळ्या गर्भागारात; पण श्रीगणपती देवालयात. श्रीगणपतीची मूळ प्राचीन पाषाण मूर्ती जी गर्भागारात अधिष्ठित होती.

त्या मूर्तीचा किंचित भग्नावस्थेचा संशय तिच्या प्राचीनत्वामुळे दिसल्यामुळे, त्या देवस्थानच्या सर्व कुळावी महाजनांनी एकत्र येऊन मूळ मूर्ती स्थानावेगळी करून तिच्या जागी नवी आकर्षक सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती विधिपूर्वक प्रतिष्ठापना कैवल्यपूर मठाधिपती श्रीमत्‌ सच्चिदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते शुक्रवार ३१ जानेवारी १९६९ रोजी केली. जुनी मूर्ती गर्भागारात उजवीकडे दुसऱ्या आसनावर सुरक्षित ठेवली आहे.

गणेश जयंती उत्सव

माघ महिन्यात साजरा होणारा गणेश जयंतीचा श्री गणेश जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी गणेशाला पाळण्यात घालतात.

दुपारी महानैवेद्य व रात्री आठ वाजता श्रींची पालखीतून व लालखीतून मिरवणूक काढतात. गणेश जयंतीपासून सतत दहा दिवस गणेश नवरात्र साजरे केले जाते. शेवटच्या दिवशी कीर्तन, भजन, गायन व रथोत्सव होतो.

स्थलांतराचा रंजक इतिहास

मंदिर स्थलांतराचा इतिहास मोठा चित्तवेधक असून पोर्तुगीज व त्यापूर्वीसुद्धा या मंदिराबाबत आणखी वेगळ्या घटना, घडामोडी आहेत.

अंदाजे इ. स. १७४९ सालाच्या आसपास हे श्रीगणपती दैवत नार्वेहून स्थलांतर करून फोंडा महालाच्या खांडोळा गावात आणून तेथे एका डोंगराच्या कुशीत सुरक्षित देवालय बांधून या दैवताची स्थापना केली.

तेव्हापासून आजपर्यंत हे देवालय खांडोळा गावात असून देवालयाच्या भागास श्रीगणपतीवाडा म्हणतात. वरील भागात वसलेल्या वस्तीला गणेशनगर, गणपतीवाडा असे नाव दिले आहे.

Khandola Mahaganpati
Illegal Hill Cutting : मळा-पणजी येथे बेकायदा डोंगर कापणी रोखली

विविध उत्सव : श्री महागणपती देवस्थानात विनायकीदिवशी उत्सवमूर्ती पालखीत बसवून मिरवणूक काढली जाते. शिवाय अक्षय तृतीया, रामनवमी, अनंतव्रत, दुर्गाष्टमी, गोकुळाष्टमी, कुष्मांड नवमी, वैकुंठ चतुर्दशी, दसरा असे विविध उत्सव असतात.

मार्गशीर्ष शुक्ल विनायकीच्या दिवशी कालोत्सव व दुसऱ्या दिवशी गवळणकाला होतो. हे दोन्ही दिवस पालखी दुपारी एक वाजता अवभ्रत स्नानासाठी तळीवर जाते. तिसऱ्या दिवशी आवळी भोजनाचा कार्यक्रम होतो. गणेश चतुर्थीदिवशी संध्याकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक असते.

Khandola Mahaganpati
कॅनडा म्हणे गोव्यात सांभाळून... विदेशी महिलांवर बलात्कार, विनयभंगाचे प्रकार वाढलेत, सूचना प्रसिद्ध

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com