Goa Pollution: पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमधील 'अंबे मेटालिक' बाबत उद्या सुनावणी होणार

Goa Pollution: अंबे मेटालिक कंपनीचा हा कारखाना अनेक कारणांनी वादात अडकलेला आहे.
Goa Pollution
Goa PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Pollution: प्रदूषणाच्या बाबतीत वादग्रस्त ठरलेल्या पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमधील अंबे मेटालिक कंपनीच्या प्रकल्पाचा विस्तारासाठी रविवार 4 डिसेंबर रोजी पिसुर्ले पंचायत सभागृहामध्ये सार्वजनिक पर्यावरणीय सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकल्पासंदर्भात नागरिक त्रस्त असून अनेकांनी संतापजनक भावना व्यक्त करून पर्यावरण सुनावणीच्यावेळी या प्रस्तावाला तीव्र विरोध करण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने ‘आमका कोळसा नका’ संघटनेचा तीव्र विरोध आहे. यामुळे 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या पर्यावरण सुनावणीच्यावेळी काय होईल, याकडे लक्ष आहे.

पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कारखाने आहेत‌. मात्र अंबे मेटालिक कंपनीचा कारखाना हा अनेक कारणाने वादग्रस्त ठरलेला आहे. सुरुवातीच्या काळात या प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते. मात्र राजकीय बळावर या कंपनीच्या व्यवस्थापनाने हा प्रकल्प कार्यान्वित केला. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून सभोवताली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

काळी पावडर वाऱ्यासोबत दूरवर अंतरावर पसरत असून यामुळे नैसर्गिक प्रदूषण होत असल्यामुळे पर्यावरण दृष्ट्या जैवविविधतेवर परिणाम निर्माण होत आहे, तसेच ह्या प्रकल्पातून प्रदूषण होत असले तरी कंपनीचा विस्तार होणार आहे.

या संदर्भाच्या प्रस्ताव या कंपनीच्या व्यवस्थापनाने व प्रदूषण महामंडळात सादर केलेला आहे. यामुळे या संदर्भाची पर्यावरणीय जनहित सुनावणी होणार असून रविवार 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत सभागृहामध्ये या संदर्भाचे आयोजन केलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tarun Tejpal Supreme Court Hearing 2026
Goa Local Jobs In Industrial Estates
Bendurde Pole Road Construction
Goa Cancer Deaths
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com