Ketan Bhatikar Death: भाटीकर मृत्यूप्रकरणी सखोल तपास व्हावा! चौकशी कर्नाटक पोलिसांनी करावी - राधाराव ग्रासियस

Ketan Bhatikar Death Case Investigation: डॉ. केतन भाटीकर यांच्या मृत्यू प्रकरणी गूढ कायम असल्याचा दावा करणारे राजकीय नेते राधाराव ग्रासियस यांनी या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी पुन्हा मागणी केली.
Ketan Bhatikar Death
Ketan Bhatikar DeathDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: डॉ. केतन भाटीकर यांच्या मृत्यू प्रकरणी गूढ कायम असल्याचा दावा करणारे राजकीय नेते राधाराव ग्रासियस यांनी या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी पुन्हा मागणी केली असून या प्रकरणाची चौकशी कर्नाटक पोलिसांकडे द्यावी ही मागणी करण्यासाठी काहीजण लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, असे सांगितले.

ॲड. ग्रासियस यांनी आज आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट टाकला असून त्यात, कधीकधी सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्‍भूत असते.डॉ. केतन भाटीकर यांच्या मृत्यूच्या बाबतीतही असेच काहीसे घडताना दिसत आहे असे म्हटले आहे.

Ketan Bhatikar Death
Goa Fishing Ban: कुटबण जेटीवर मासेमारी बंदीबाबत कडक नियम; बोटी-जाळ्यांवर निर्बंध, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

तक्रारीनुसार सर्पदंश कर्नाटकात झाला असतानाही, गोवा पोलिसांनी या ‘अनैसर्गिक मृत्यूचा’ तपास करण्याचे का ठरवले, या गोष्टीने माझे कुतूहल जागे केले. जेव्हा मी प्रसारमाध्यमांद्वारे पोलिसांना हे प्रकरण कर्नाटक पोलिसांकडे सोपवण्याची विनंती केली, तेव्हा लागलीच भाटीकर कुटुंबीयांकडून याला आक्षेप घेण्यात आला. ही गोष्ट अजिबात पटण्यासारखी नव्हती असे त्यांनी म्हटले आहे.

Ketan Bhatikar Death
Goa Fishing Ban: कुटबण जेटीवर मासेमारी बंदीबाबत कडक नियम; बोटी-जाळ्यांवर निर्बंध, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

लवकरच तथ्य जनतेसमोर येईल!

मी वैयक्तिकरित्या काँग्रेसचे गोवा अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार कार्लोस आल्वारीस यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. परंतु, काहीच झाले नाही.

आता या मृत्यू प्रकरणी वेगळीच माहिती प्रसारित झाली आहे. बहुदा म्हणूनच पुढील तपासासाठी टाळाटाळ केली जात असावी, असे ग्रासियस यांनी म्हटले आहे. सध्या उच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी एक याचिका तयार केली जात असून, ती सादर केल्यानंतर उर्वरित तथ्य लवकरच जनतेसमोर येईल असे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com